The security guard of the cement factory was shot and his rifle was stolen | सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल मारहाण करून पळविली

सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल मारहाण करून पळविली

ठळक मुद्दे बुधवारी रात्री सुरक्षा रक्षकांच्या कक्षात अज्ञात तीन जण आले. त्यांनी या रक्षकांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील एक रायफल व दहा राऊंड पळवून नेले.

वणी (यवतमाळ) : वणी तालुक्याच्या शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील एसीसी सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल आणि दहा राऊंड मारहाण करून पळविल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. शिरपूर पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध चालविला आहे. 
वणी तालुक्यातील शिंदोला येथे एसीसी सिमेंटची फॅक्टरी आहे. बुधवारी रात्री सुरक्षा रक्षकांच्या कक्षात अज्ञात तीन जण आले. त्यांनी या रक्षकांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील एक रायफल व दहा राऊंड पळवून नेले. हे आरोपी नेमके कोण, याची चर्चा होऊ लागली आहे. जिल्ह्यातील वणीसह पाच तालुके आणि आठ पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र हे नक्षल प्रभावित म्हणून घोषित आहे. या घटनेशी त्याचा तर काही संबंध नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. शिरपूर पोलीस सर्व पैलूंनी या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: The security guard of the cement factory was shot and his rifle was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.