व्हॉट्सअॅप चॅटिंगवरून पती-पत्नीत सतत वाद, पतीसोबतच 'त्या' तरुणीनंही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:09 PM2018-10-01T13:09:53+5:302018-10-01T13:10:16+5:30

भांडण इतके विकोपाला गेले की, नवऱ्याने शनिवारी गळफास लावून आत्महत्या करून आपले जीवन संपविले आणि दुसऱ्या दिवशी चॅट करणाऱ्या १९ वर्षीय मुलीने देखील अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली. 

Secunderabad: Woman objects to husband chatting with young girl on WhatsApp, they commit suicide | व्हॉट्सअॅप चॅटिंगवरून पती-पत्नीत सतत वाद, पतीसोबतच 'त्या' तरुणीनंही संपवलं जीवन

व्हॉट्सअॅप चॅटिंगवरून पती-पत्नीत सतत वाद, पतीसोबतच 'त्या' तरुणीनंही संपवलं जीवन

Next

हैद्राबाद - सिकंदराबाद येथे मैत्रिणीसोबत नवरा सतत मोबाइलवर चॅटिंग करत असल्याने बायको रागावली होती. रागाच्याभरात नवऱ्याला टोमणे मारायची. मात्र, शुक्रवारी व्हॉट्सअॅपवर चालणाऱ्या सततच्या चॅटिंगवरून या नवरा - बायकोत कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, नवऱ्याने शनिवारी गळफास लावून आत्महत्या करून आपले जीवन संपविले आणि दुसऱ्या दिवशी चॅट करणाऱ्या १९ वर्षीय मुलीने देखील अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली. 

या दांपत्याचं काही काळापूर्वीच लग्न झालं होतं. ही घटना तेलंगणामधील सिकंदराबाद येथे घडली. शिव कुमार (वय २७) असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. त्याचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. मात्र त्याला व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायची सवय होती. लग्नानंतर तो १९ वर्षीय तरुणीशी वारंवार व्हॉट्सअॅपवर गप्पा मारायचा. त्यामुळे त्याची बायको त्रस्त होती. अनेकदा तिने त्याला समजावले देखील होते. पण त्याची चॅटिंगची सवय सुटली नाही. नंतर बायकोने त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. त्याचाही काही परिणाम त्याच्यावर झाला नाही. शेवटी दोघांत कडाक्याचे भांडण होऊ लागले. ही घटना घडली त्याच्या आदल्यादिवशीही म्हणजेच शुक्रवारी त्या दोघांमध्ये चॅटिंगवरून जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात शिवच्या बायकोने शेजारपाजाऱ्यांनाही त्याच्या या सवयीबद्दल सांगितलं. तसेच तिने घरातील ज्येष्ठ मंडळींना याप्रकरणी तक्रार करणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर शिवने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी रविवारी चॅट करणाऱ्या मैत्रिणीने ही अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी वेस्ट मॅरेडपाली पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Secunderabad: Woman objects to husband chatting with young girl on WhatsApp, they commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.