लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: बदलापूर पश्चिम भागात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर व्हॅनचालकाने अत्याचार केल्याची अमानुष घटना गुरुवारी घडली. विशेष म्हणजे पालक शाळा प्रशासनाकडे जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर मुख्याध्यापिकेने व्हॅनचालकाची बाजू घेतल्याने पालकांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन बालिकांचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनेनंतर दीड वर्षाने पुन्हा अत्याचाराची घटना घडली आहे. नर्सरीत शिकणाऱ्या या चिमुकलीला व्हॅनचालक शाळेतून घरी नेत होता. रोज दुपारी दीड वाजता येणाऱ्या व्हॅनला खूप उशीर झाल्याने मुलीच्या आईने व्हॅनचालकाला फोन केला. त्यानंतर व्हॅन पाऊण तास उशिराने आली. व्हॅनमधून उतरल्यानंतर पीडित मुलगी रडत होती. आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली. मुलीने सर्व प्रकार मुख्याध्यापिकेसमोर सांगितल्यानंतरही शाळेने गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप पालकांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार)च्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला.
काहीतरी चुकीचे घडल्याचे पालकांच्या आले लक्षात
पीडित मुलीच्या आईने तीन वेळा व्हॅनचालकाला फोन केला. नेहमीपेक्षा आज व्हॅन पाऊण तास उशिरा का आली, असा जाबही त्याला विचारला. इतर मुलांना सोडायचे होते, म्हणून उशीर झाला, असे कारण चालकाने सांगितले. मात्र मुलीची अवस्था पाहिल्यानंतर पालकांना काहीतरी चुकीचे घडल्याचे लक्षात आले.
आरोपीला समोर पाहून मुलगी घाबरली
व्हॅनचालकाला शाळेत बोलावल्यावर त्याला पाहून पीडित मुलगी घाबरली आणि ती पालकांच्या मागे लपली. त्यावरूनच घडलेला प्रकार किती गंभीर होता, याची जाणीव पालकांना झाली. मात्र शाळा प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी पोलिस ठाणे गाठले.
व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नव्हती
या स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नव्हती, अशीही माहिती आता मिळाली आहे. त्यामुळे बस चालकासह शाळा प्रशासनावरही कठोर कारवाई करण्याची मागणी बदलापूरमधील नागरिक करीत आहेत.
Web Summary : A four-year-old girl was sexually assaulted in a school van in Badlapur. The school principal allegedly supported the driver, prompting the parents to file a police complaint. The driver has been arrested, and an investigation is underway. The incident sparked outrage, with demands for strict action against the school.
Web Summary : बदलापुर में एक स्कूल वैन में चार साल की बच्ची के साथ यौन उत्पीड़न किया गया। स्कूल की प्रिंसिपल ने कथित तौर पर ड्राइवर का समर्थन किया, जिसके बाद माता-पिता ने पुलिस में शिकायत दर्ज कराई। ड्राइवर को गिरफ्तार कर लिया गया है, और जांच चल रही है। घटना से आक्रोश फैल गया, स्कूल के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई है।