शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सांभाळा! फ्री फायर गेमच्या नादी लागलेली शाळकरी मुले निघाली मुंबईकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 21:04 IST

crime News: पालक आणि पोलिसांची तारांबळ : नाशिकला ट्रेनमधून उतरविले 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फ्री फायर गेमच्या नादी लागलेली नागपुरातील तीन शाळकरी मुले आज भल्या सकाळी घरून निघून गेली. पालक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मुले रेल्वेद्वारे मुंबईकडे जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरपीएफच्या मदतीने सायंकाळी या तिघांना नाशिक रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. पालकांच्या काळजाची धडधड वाढविणारी ही घटना शनिवारी नागपुरात घडली. 

१५, १६ आणि १७  वर्षे वय असलेली ही तीनही मुले प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. ते दहावीचे विद्यार्थी आहेत. कोरोना संसर्गाच्या भितीमुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाइन क्लासच्या नावाखाली हे तिघेही आपापल्या घरी फ्री फायर ऑनलाइन गेम खेळत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विरंगुळा म्हणून पालकांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, या तिघांनाही व्यायामाची आवड असून रोज भल्या सकाळी ते फिरायला जात होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी बॅग घेऊन ते मॉर्निंगवाकला जातो म्हणून घरून निघून गेले. ९ वाजले तरी ते घरी परत आले नाही. त्यामुळे तीनही मुलांच्या आईवडिलांनी एकमेकांकडे चौकशी केली. विशेष म्हणजे, यातील एका मुलाने आपल्या आईला शुक्रवारी सायंकाळी आपण उद्या सकाळी मित्रांसोबत मुंबईला फ्री फायर गेमचे टूर्नामेंट खेळन्यासाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. आईने कुणासोबत जात आहे, अशी विचारणा केल्यानंतर सध्या क्लास आणि नंतर परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे आता जायचे नाही, परीक्षा संपल्यानंतर जा असे म्हणून त्याला गप्प केले. यावेळी त्या मुलाने ओके म्हणत आपल्या आई-वडिलांना संशय येणार नाही, याची काळजी घेतली. 

तो आज सकाळी घरून जाताना बॅगमध्ये कपडे घेऊन गेल्याचे आईच्या लक्षात आल्याने तिने मुलाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर या मुलाचेआई-वडील त्याच्या मित्राच्या घरी गेले. तेव्हा तो सुद्धा घरून मॉर्निंग वॊकच्या बहाण्याने बॅग घेऊन आणि त्यात स्वतःचे कपडे भरून गेल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या मुलाच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याने ते पळून गेल्याचा निष्कर्ष पालकांनी काढला. त्यानंतर तिन्ही मुलांच्या पालकांनी लगेच प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठले. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त  डॉ. दिलीप झळके, पोलिस उपायुक्त नूरुल हसन यांना कळली. त्यांनी तातडीने पोलीस पथक रेल्वेस्थानकावर पाठवले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही तीनही मुले मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक पोलीस. रेल्वे पोलीस, आरपीएफच्या अधिकाऱयांनी अकोला, जळगाव नाशिक आणि मुंबई रेल्वे पोलिसांना अलर्ट दिला. या मुलाचे लोकेशन्स काढल्यानंतर हे तिघे बसून असलेली रेल्वेगाडी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान नाशिकला पोहोचणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार नाशिक स्थानकात रेल्वे गाडी थांबताच पोलिसांनी त्या तिघांना आरपीएफने ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर या तिघांना नागपूरकडे परत कसे पाठवावे, या संबंधाने विचार विमर्श सुरू होता.असा आहे फ्री फायर गेम२०१९ चा जगातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला फ्री फायर ऑनलाइन गेम एकाच वेळी ५० जण खेळू शकतात. विमान / हेलिकॉप्टर मधून पॅराशूटच्या माध्यमाने बेटावर उडी घ्यायची आणि तेथे दडून असलेल्या अन्य ४९ जणांना शोधून वेगवेगळ्या शस्त्राच्या आधारे ठार मारायचे, जो एक शिल्लक राहिल, तो गेमचा 'विनर', असा हा गेम आहे.----

टॅग्स :Policeपोलिस