Scary! The assistant general manager killed his wife and burned her body at home; Asked 'this' reason | भितीदायक! असिस्टंट जनरल मॅनेजरने पत्नीची हत्या करून मृतदेह घरातच जाळला; विचारल्यावर सांगितले 'हे' कारण 

भितीदायक! असिस्टंट जनरल मॅनेजरने पत्नीची हत्या करून मृतदेह घरातच जाळला; विचारल्यावर सांगितले 'हे' कारण 

ठळक मुद्देआरोपी पत्नी अनुपमा आणि तीन मुले यांच्यासह बंगाच्या एनआरआय कॉलनीत राहत होता. मंगळवारी संध्याकाळी अनिल त्याचा आठ वर्षांचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा घेऊन कंपनीच्या कार्यालयात आला.

पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी रोपड़-फगवाड़ा मुख्य रस्ता आणि उड्डाणपूल बनविणार्‍या जीआर इन्फ्रा कंपनीच्या सहाय्यक महाव्यवस्थापकाने पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि नंतर मृतदेह घरातच जाळला. कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांच्या माहितीवरून बंगा शहर  पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्टेशन प्रभारी विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील कुछ माट्ठा गावात राहणारा अनिल कुमार जीआर इन्फ्रा कंपनीत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून तैनात आहे. बंगा येथे कंपनी उड्डाणपूल बांधत आहे. आरोपी पत्नी अनुपमा आणि तीन मुले यांच्यासह बंगाच्या एनआरआय कॉलनीत राहत होता. मंगळवारी संध्याकाळी अनिल त्याचा आठ वर्षांचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा घेऊन कंपनीच्या कार्यालयात आला. तेथे त्याने तिन्ही मुलांबरोबर जेवण केले. यावेळी तेथे उपस्थित इतर कर्मचार्‍यांनी अनिल कुमारला पत्नी न येण्याबाबत विचारले. पण त्याने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही.थोड्या वेळाने अनिलने आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्यांना पत्नी अनुपमावर संशय होता. यामुळे त्याने अनुपमाचा गळा घोटला आहे. यानंतर मृतदेह जाळण्यात आला. स्टेशन प्रभारीच्या मते, यानंतर कंपनीचे अधिकारी बलबीर सिंग यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी अनिलला अटक केली. पोलिसांनी एनआरआय कॉलनी येथील आरोपीच्या घरातून अनुपमाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कंपनी अधिकारी बलबीर सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे अनिल कुमारविरूद्ध खुनासह अनेक कलमांत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.

Read in English

Web Title: Scary! The assistant general manager killed his wife and burned her body at home; Asked 'this' reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.