शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 20:50 IST

सौरभच्या मृत्यूला ९ दिवस झाले, पण त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या आठवणीत आईचे अश्रू थांबत नाहीत.

मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात २७ वर्षीय सौरभ तिवारी या तरूणाने लग्नाच्या ४५ दिवसांनी आत्महत्या केली आहे. तो हैदराबाद येथे नोकरी करत होता. गळफास घेऊन त्याने जीवन संपवलं. आत्महत्येआधी सौरभने त्याच्या आईला शेवटचा कॉल करून पत्नीला घटस्फोट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या सौरभच्या आत्महत्येचा गुंता सोडवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. कुटुंबाने सौरभच्या पत्नीवर परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.

सौरभ तिवारीचं श्रेया नावाच्या मुलीसोबत लग्न झाले होते. २३ मे रोजी धुमधडाक्यात या दोघांचे लग्न पार पडले. सौरभ हैदराबाद येथे नोकरी करत होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तो हैदराबादला परतला. ८ ऑगस्टला सकाळी १० वाजता सौरभने आईला फोन केला. तेव्हा आई माझा घटस्फोट करून दे, मला आता जगायचं नाही असं ऐकताच सौरभची आई घाबरली. तिने मुलाला सर्व काही ठीक होईल असा धीर दिला. त्यानंतर दुपारी सौरभने आत्महत्या केल्याचं समोर आले. हैदराबाद येथे मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा सौरभ पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

सौरभच्या मृत्यूला ९ दिवस झाले, पण त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या आठवणीत आईचे अश्रू थांबत नाहीत. माझा मुलगा साधा होता. लग्नानंतर तो चिंतेत राहू लागला. सून त्याला टोमणे मारायची, रोज फोनवर दुसऱ्या कुणाशी बोलत होती. मुलगा रडत रडत म्हणायचा, आई मी आता जगू शकत नाही. मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु तो हरला. माझ्या समोर माझा मुलगा गेला असं सौरभची आई सांगत होती. तर तरुण मुलाला गमावल्याने वडील कमलेश तिवारी संतापले होते. लग्नानंतर सून आणि तिच्या घरचे मुलाकडून वारंवार पैसे मागायचे, जमीन मागत होते. त्याच्याकडे १० लाख रूपये आणि ५ एकर जमीन मागितली होती. मी इतके पैसे कुठून आणू असं मुलगा मला विचारायचा असं त्याचे वडील म्हणाले. 

दरम्यान, सौरभची बहीण शुभी तिवारी त्याच्या खूप जवळ होती. २ महिन्यापूर्वी माझ्या भावाचे लग्न झाले. सर्व खुश होते. पण माझ्या भावाला मारण्याचा कट रचला जातोय हे माहिती नव्हते. लग्नाआधीच श्रेयाचे अफेअर होते, तिच्या घरच्यांना हे माहिती  होते तरीही त्यांनी माझ्या भावाशी तिचे लग्न लावले. लग्नानंतर ती आनंदी नव्हती. ती दुसऱ्या कुणाशी बोलत असायची. भावाने तिला विचारले, पण तिने माझे मन करेल, ते मी करणार असं त्याला सांगितले. आई वडिलांनी माझे जबरदस्तीने लग्न लावले असं वहिनीने सांगितले. भावाला तिच्यापासून घटस्फोट हवा होता, पण तिने तो देण्यास नकार दिला. अखेर त्याने कंटाळून आत्महत्या केली असा आरोप सौरभच्या बहिणीने केला आहे. 

पत्नी श्रेयाने फेटाळले आरोप

मी सौरभला कधी धोका दिला नाही. मला माझ्या आई वडिलांचा मानसन्मान माहिती आहे. वडिलांनी मेहनतीने माझे लग्न लावून दिले होते. परंतु सासरचे मला हुंड्यासाठी छळत होते. सौरभची शारीरिक क्षमता कमी होती, त्याचा उल्लेख त्याने माझ्याकडे केला होता. मी त्याला डॉक्टरकडे दाखव म्हटले, त्यावर तो तुझं आयुष्य माझ्यामुळे खराब होईल असं म्हणायचा. २४ तासांमध्ये १८ तास मी पतीसोबत राहत होती, मग दुसऱ्याशी का बोलेन, मुलाचा कमीपणा लपवण्यासाठी माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत असं सौरभची पत्नी श्रेयाने म्हटलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार