Satara Crime news: सातारा: महिलेची पर्स हिसकावली अन् चोरटा तोल जाऊन डोक्यावर पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 19:46 IST2021-10-03T19:46:42+5:302021-10-03T19:46:58+5:30
Satara Crime news: संजीवन हॉस्पिटलजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या एका युवकाने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पलायन केले. त्यांच्या पर्समध्ये तीनशे रुपयांची रोकड होती.

Satara Crime news: सातारा: महिलेची पर्स हिसकावली अन् चोरटा तोल जाऊन डोक्यावर पडला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : चालत निघालेल्या महिलेची पर्स हिसकावल्यानंतर चोरट्याचा तोल गेल्याने चोरटा खाली पडला. यामध्ये चोरट्याचा डोक्याला लागले असल्याची घटना घडली. हा प्रकार संजीवनी हॉस्पिटलजवळ शनिवार, दि. २ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.
मनिषा मंगेश लाड (वय ३८, रा. लिलाताइ हाऊसिंग सोसायटी चर्चजवळ, सदर बझार, सातारा) या शनिवारी दुपारी भाजीपाला खरेदीसाठी चालत निघाल्या होत्या. संजीवन हॉस्पिटलजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या एका युवकाने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पलायन केले. त्यांच्या पर्समध्ये तीनशे रुपयांची रोकड होती. संबंधित युवक पळून जात असताना रिमांडहोमजवळील सेंट थॉमस चर्चच्या कंपाऊंडच्या रॉडला धडकून तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अशा अवस्थेतही संबंधित युवक तेथून पसार झाला. या प्रकारानंतर लाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.