शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

सासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्या; इंधनाच्या वाढत्या महागाईमुळे चोरट्यांनी फोडली पाईप लाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:18 IST

Saswad's wells were filled with petrol and diesel : याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल पाईपलाईन जमिनीखालून सासवड ( झणझणे ) ता . फलटण गावच्या हद्दीतून गेली आहे

आदर्की : मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल पाईपलाईन जमिनीखालून सासवड ( झणझणे ) ता . फलटण गावच्या हद्दीतून गेली आहे. सासवड गावापासून दोन कि.मी अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात पाईपलाईन मधून पेट्रोल मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनास आले. शेतातील ऊसाच्या सऱ्या,ज्वारीचे वाफे यामध्ये लाखो लिटर पेट्रोल साठून राहिल्याने ज्वारी, मका, ऊस , गवत करपून गेले आहे. संबधीत कंपनीने टँकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यात सुरूवात केली आहे.घटनास्थळापासून १ किमी परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला असून घटनास्थळी अग्नीशमक दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू आहे. विहिरीत चार इंच पेट्रोलचा थर आल्याने परिसरात पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

 

तीन दिवसांपासून सुरु आहे गळतीसासवड परिसरात पेट्रोलची दुर्गधी येत असून शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. संबधित कंपनीने पेट्रोल पाईप लाईन तातडीने बंद केली. पंरतू पाईपलाईन मधील पेट्रोलची तीन दिवस गळती सुरु होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शेतात पेट्रोल पसरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पेट्रोल विहिरीत पाझरून पाणी दूषित झाल्याने पिण्यासाठी गावातून पाणी आणावे लागत आहे. त्याबरोबरच शेतीचेही मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे. - रंजना लोंखडे,  सासवड (झणझणे ) ता . फलटण

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPetrolपेट्रोलFuel Hikeइंधन दरवाढ