शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ते' लिव्ह-इन पार्टनर नव्हते, त्यांचं लग्न झालं होतं; मनोज-सरस्वतीच्या नात्याबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 18:03 IST

mumbai mira road murder case : मनोज आणि सरस्वती यांचे लग्न झाले होते आणि त्यांनी मंदिरात लग्न केले होते, असे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, सरस्वतीने आपल्या बहिणींनाही या लग्नासंदर्भात माहिती दिली होती. मात्र असे असले तरी, ती मनोजला मामा म्हणूनच सांगत असे.

मुंबई - मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या हत्येने संपूर्ण देशात हादरला आहे. मनोज साने (52) वर, 32 वर्षीय सरस्वतीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. मनोज आणि सरस्वती यांचे लग्न झाले होते आणि त्यांनी मंदिरात लग्न केले होते, असे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, सरस्वतीने आपल्या बहिणींनाही या लग्नासंदर्भात माहिती दिली होती. मात्र असे असले तरी, ती मनोजला मामा म्हणूनच सांगत असे. 

सरस्वतीला तीन बहिणी आहेत. लहानपणी त्यांचे आई-वडील विभक्त झाले होते. आई-वडील विभक्त झाल्यानंतर सरस्वती आपल्या आईसोबत राहत होती. मात्र काही वर्षांतच तिच्या आईचाही मृत्यू झाला. यानंतर, सरस्वती अहमदनगर येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रमात राहू लागली होती. त्यांनी येथेच पहिली ते दहावीपर्यंतच शिक्षण घेतले. दहा वर्षे ती याच आश्रमात होती.

सरस्वतीने वयाची 18 वर्षेपूर्ण झाल्यानंतर आश्रम सोडला आणि ती छत्रपती संभाजीनगर येथे बहिणीसोबत राहू लागली. ती चार वर्षे बहिणीसोबत होती. यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली आणि येथेच ती मनोज सानेच्या संपर्कात आली.

मनोज सानेने नौकरी मिळवण्यासाठी केली मदत - यानंतर, मनोज सानेने सरस्वतीला मुंबईत नोकरी मिळवण्यासाठी मदत केली. सरस्वतीला मुंबईत राहण्यासाठी जागा मिळात नव्हती, तेव्हा मनोजने तिला बोरिवलीतील आपल्या फ्लॅटमध्ये जागा दिली. ती काही काळ बोरिवलीतच मनोजच्या फ्लॅटमध्ये राहिली. याच काळात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कायदेशीरपणे लग्न करायचे होते. मात्र, नंतर त्यांनी मंदिरात लग्न केले.

मनोज साने आणि सरस्वती हे गेल्या सात वर्षांपासून मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये राहत होते. सरस्वती मुळची छत्रपती संभाजीनगरची आहे. आश्रमात सरस्वतीचे काही शैक्षणिक कागदपत्रेही होते. यासाठी ती मनोजसोबत नेहमीच अहमदनगरला जात असे. येथे तिने मनोज आपला मामा असल्याचे सांगितले होते. आता सरस्वतीच्या बहिणींचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यांची डीएनए चाचणीही केली जाणार आहे.

टॅग्स :Mira Road Murderमीरा रोडmira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस