शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; शिष्याच्या वेशात आले, पाया पडले अन् ज्योतिषाचार्यांवर चाकूने सपासप वार केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:59 IST

हुबळीच्या एका हॉटेलमध्ये वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हुबळी- 'सरल वास्तू'फेम चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये हॉटेलच्या रिसेप्शनवर दोन जण त्यांच्यावर सपासप वार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलकोट येथील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर यांनी कंत्राटदार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि तिथेच ते स्थायिक झाले. पुढे त्यांनी इथेच स्थापत्य व्यवसाय सुरू केला. 3 दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एका मुलाचा हुबळी येथे मृत्यू झाला होता, त्यामुळे ते हुबळीला गेले होते. या घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. 

व्हिडिओमध्ये काय आहे?दोन आरोपी हॉटेलच्या वेटिंग एरियात चंद्रशेखर गुरुजींची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. चंद्रशेखर आल्यानंतर एक आरोपी जवळ जातो आणि त्यांच्या पायाला स्पर्श करतो. त्याचवेळी दुसरा आरोपी चाकू काढून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. यादरम्यान, दुसरा आरोपीही त्याच्या खिशातून चाकू काढतो आणि दोघे मिळून त्यांच्यावर चाकूने वार करतात. यावेळी हॉटेलमधील काही लोक त्यांना वाचवण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतात, मात्र आरोपी त्यांना धक्काबुक्की करतात. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसDeathमृत्यू