शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?; पोलिसांनी स्वप्ना पाटकरांकडून ओरिजिनल ऑडिओ मागवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 21:15 IST

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पाटकर यांना ईडीसमोर साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे

मुंबई : ईडीने अटक केलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईपोलिसांनी नोंदवलेल्या धमकीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून मूळ (ओरिजिनल) ऑडिओ क्लिप मागवण्यात आली आहे. स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर स्वप्ना यांना फोनवरून जीवे मारण्याची आणि दुष्कर्म करण्याची धमकी देण्यात आली.संजय राऊत यांनी पाटकर यांना ईडीसमोर साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पाटकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना पाटकर यांच्यासोबत बोलणाऱ्या कॉलरची ओळख पटवायची आहे, त्यामुळे मूळ ऑडिओची कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये चाचणी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.2016 च्या ऑडिओमध्ये धमकी देत आहे एक माणूसनुकतीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये एक पुरुष एका महिलेला अपमानास्पद भाषेत धमकावताना ऐकू येत आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती, पण आम्हाला मूळ ऑडिओ हवा आहे. हा ऑडिओ 2016 मध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती, मात्र आम्हाला मूळ ऑडिओ हवा आहे. हा ऑडिओ 2016 मध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. मूळ रेकॉर्डिंग सापडल्यानंतर, कॉलरची ओळख स्थापित करण्यासाठी आम्ही फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेची मदत घेऊ.पाटकर यांना सुरक्षा पुरवलीपोलिसांनी राऊत यांच्याविरुद्धच्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ , ५०६ आणि ५०९ या कलमांचा वापर केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी रविवारी पोलिसांत जबाब नोंदवला. पाटकर यांच्या विनंतीवरून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. टाईप केलेल्या पत्रात आपल्याला बलात्कार आणि खुनाची धमकी देण्यात आल्याचे पाटकर यांनी पोलिसांना सांगितले होते. हे पत्र 15 जुलै रोजी त्यांच्या घरी आलेल्या वर्तमानपत्रात टाकण्यात आले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबईPoliceपोलिस