संजय पांडे यांना आता सीबीआयने केली अटक; अवैधरित्या फोन टॅपिंग झाल्याचे उघडकीस
By मनोज गडनीस | Updated: September 24, 2022 18:35 IST2022-09-24T18:35:27+5:302022-09-24T18:35:50+5:30
याच प्रकरणात सीबीआयने ८ जुलै रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान तसेच कार्यालयांवर छापेमारी केली होती.

संजय पांडे यांना आता सीबीआयने केली अटक; अवैधरित्या फोन टॅपिंग झाल्याचे उघडकीस
मुंबई - राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर, आता शनिवारी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सन २००९ ते २०१७ या कालावधीमधे राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग झाल्याचे उघडकीस आले होते.
याच प्रकरणात सीबीआयने ८ जुलै रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान तसेच कार्यालयांवर छापेमारी केली होती. तसेच, संजय पांडे, त्यांच्या कंपनीचे सध्याचे संचालक संतोष पांडे (संजय पांडे यांची आई), अर्मान पांडे (संजय पांडे यांचा मुलगा) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ८ जुलै रोजी सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पांडे यांच्या कंपनीतून सर्व्हर, २५ लॅपटॉप, काही डेस्कटॉप संगणक ताब्यात घेतले होते.