शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

Video : "सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट" ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट, याचा कुठल्याही संस्थेशी संबंध नाही - अजय श्रीवास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 8:19 PM

Sanatan Dharma Pathshala Trust is my personal trust- Ajay Shrivastav : पहिले केंद्र बनवण्यास आम्ही दाऊद इब्राहिमच्या जागेची निवड केली आहे. तेथून आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करणार आहोत, असे स्पष्टीकरण वकील अजय श्रीवास्तव यांनी लोकमतशी बोलताना दिले आहे.

नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सनातन संस्थेचा उल्लेख केला. कोकणातील दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले. मात्र, लिलावात दाऊदची जागा खरेदी करणाऱ्या वकील अजय श्रीवास्तव यांनी केला हा खुलासा केला आहे. ''सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट'' ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट, याचा कुठल्याही संस्थेशी संबंध नाही आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मदरश्यातून ज्या प्रकारे शिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करत आहोत. त्याचे पहिले केंद्र बनवण्यास आम्ही दाऊद इब्राहिमच्या जागेची निवड केली आहे. तेथून आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करणार आहोत, असे स्पष्टीकरण वकील अजय श्रीवास्तव यांनी लोकमतशी बोलताना दिले आहे. 

रत्नागिरी  दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले.त्यावर आता सनातन संस्थेने सविस्तर खुलासा केला आहे. सनातन संस्थेने म्हटलं आहे की, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अ‍ॅड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. 

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमRatnagiriरत्नागिरीSanatan Sansthaसनातन संस्थाnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस