सॅल्युट! पोलिसाने प्रसंगावधान दाखवले म्हणून रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या तरुणीचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:17 PM2020-12-12T23:17:09+5:302020-12-12T23:22:52+5:30

Crime News : गुरुवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. २३ वर्षीय अनीशा शेख सँडहर्स्ट रोड स्थानकावर लोकलची वाट पाहत उभी होती.

Salute! The young woman who fell on the railway track was saved as the police showed foresight | सॅल्युट! पोलिसाने प्रसंगावधान दाखवले म्हणून रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या तरुणीचे प्राण वाचले

सॅल्युट! पोलिसाने प्रसंगावधान दाखवले म्हणून रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या तरुणीचे प्राण वाचले

googlenewsNext

मुंबई - सँडहर्स्ट रोड स्थानकात चक्कर येवून रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या 23 वर्षीय तरुणीचा जीव आरपीएफ पोलिसाने प्रसंगावधान दाखवून वाचवले.

 

काही प्रवासी सँडहर्स्ट रोड स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभे होते. लोकल समोरुन येत असताना प्रवाशांमध्ये उभी असणारी एक बुरखाधारी तरुणी अचानक खाली कोसळली. ट्रॅकपासून फार जवळ उभी असल्याने ही तरुणी ट्रॅकवर जाऊन कोसळली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. दरम्यान आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत धाव घेतली आणि तरुणीचा जीव वाचवला. हा सगळा थरारक   प्रकार  सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

 

गुरुवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. २३ वर्षीय अनीशा शेख सँडहर्स्ट रोड स्थानकावर लोकलची वाट पाहत उभी होती. यावेळी चक्कर आली आणि ती ट्रॅकवर जाऊन कोसळली. लोकल येत असल्याने तरुणी त्याच्याखाली जाईल या भीतीने प्रवासी हात दाखवून मोटरमनला लोकल थांबवण्याचा इशारा करत होते. तेव्हा तिथे कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कॉन्स्टेबल श्याम सुरत यांनी धाव घेतली. त्यांनी थेट ट्रॅकवर उडी मारली आणि प्रवाशांच्या मदतीने तरुणीला प्लॅटफॉर्मवर आणलं आणि जीव वाचवला. श्याम सुरत यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं म्हणून अनर्थ टळला आणि तरुणीचा जीव वाचला.

Web Title: Salute! The young woman who fell on the railway track was saved as the police showed foresight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.