फरार सलीम मुल्लाला भावासह अटक, पोलिसांवरील हल्ला प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 17:27 IST2019-04-14T17:26:12+5:302019-04-14T17:27:47+5:30
यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून फरार झालेल्या मटका चालक सलीम यासीन मुल्ला (४५) त्याचा भाऊ फिरोज मुल्ला यांना सांगली-मिरज परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.

फरार सलीम मुल्लाला भावासह अटक, पोलिसांवरील हल्ला प्रकरण
कोल्हापूर - यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून फरार झालेल्या मटका चालक सलीम यासीन मुल्ला (४५) त्याचा भाऊ फिरोज मुल्ला यांना सांगली-मिरज परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.
पोलीस पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्ला, तिचा पती सलीम मुल्ला, दीर राजू मुल्ला, जावेद मुल्ला यांच्यासह ४० जणांवर ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल करून ५० गुन्ह्यांचा समावेश केला आहे. मुल्ला कुटुंबीयांची व समर्थकांची मग्रुरी वाढल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली ‘मोक्का’ची कारवाई केली. पोलिसांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.