शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

इंश्युरन्स कंपनीच्या सेल्स मॅनेजरने 3 वर्ष केला बलात्कार, आधी I LOVE YOU म्हणाला; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:23 IST

Rape Case :अनेकदा सांगूनही सेल्स मॅनेजर लग्नासाठी तयार न झाल्याने पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.

इंदूरमधील एका विमा कंपनीतील रिलेशनशिप मॅनेजरने तिच्याच कंपनीच्या सेल्स मॅनेजरवर बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपीचे रिलेशनशिप मॅनेजरसोबत लग्नाच्या नावाखाली तीन वर्षांपासून संबंध होते. अनेकदा सांगूनही सेल्स मॅनेजर लग्नासाठी तयार न झाल्याने पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. पोलिसांना अद्याप आरोपी पकडता आलेले नाही.एसआय रुपाली भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयजी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, मिलान हाईट्स येथील ३२ वर्षीय रजत अग्रवाल याने लग्नाच्या नावाखाली फसवून माझ्यावर बलात्कार केला. आरोपी रजत हा पीडितेसोबत विमा कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. दोघांची ओळख एकाच कार्यालयात झाली.कामाच्या ठिकाणी प्रभावित झाले आणि मित्र बनलेपीडितेने पोलिसांना सांगितले की, ती एलआयजी परिसरात राहते. ती हरदाहून इंदूरला कामासाठी आली होती. ती तीन वर्षांपासून एका विमा कंपनीत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत आहे. एकाच कंपनीत काम करत असताना दोघांची मैत्री झाली. यासोबतच दोघे व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलत होते.वाढदिवसाला केक-पुष्पगुच्छ घेऊन आला, प्रेम व्यक्त करून बलात्कार केलातीन वर्षांपूर्वी पीडितेच्या वाढदिवशी रजत केक आणि पुष्पगुच्छ घेऊन तिच्या फ्लॅटवर पोहोचला. येथे त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच आपले प्रेमही व्यक्त केले. यानंतर रजतने तिच्याशी संबंध ठेवले. त्यानंतरही रजत पीडितेच्या घरी येत राहिला.लग्नासाठी विचारले असता तो म्हणाला, हे नाते मैत्रीचे आहेपीडितेने सांगितले की, कामादरम्यान रजत पूर्वी अनेकदा लग्नाबाबत बोलत असे. काही दिवसांपूर्वी मुलीने लग्नाबाबत बोलले असता रजतने लग्नाचा प्रस्ताव मागे घेत तो म्हणाले हे नाते फक्त मैत्री होते. काही दिवसांनी रजतचे बोलणे बंद झाले. मोबाईल वरही ब्लॉक केला.रविवारी रात्री पीडितेने रजतला फोन केला असता त्याने तिला धमकी दिली. आणि कॉल डिस्कनेक्ट केला. यानंतर पीडितेने सोमवारी महिला पोलिस ठाणे गाठून येथे अर्ज केला. पोलिसांनी रजत याच्यावर बलात्कार आणि अन्य गुन्ह्यातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून मंगळवारी त्याचा शोध सुरू केला.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश