भुसावळमध्ये गावठी पिस्तुलाची विक्री; तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 17:05 IST2023-05-04T17:04:42+5:302023-05-04T17:05:19+5:30
साकेगाव मराठी शाळेच्या ग्राउंडवर शाहरुख पटेल हा गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

भुसावळमध्ये गावठी पिस्तुलाची विक्री; तीन जणांना अटक
नरेंद्र पाटील
भुसावळ, जि. जळगाव : गावठी पिस्तूल विक्रीप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन जिवंत काडतुसांसह एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साकेगाव येथे बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
शाहरुख राजू पटेल (२५), विकास पांडुरंग लोहार (३०, दोन्ही रा. साकेगाव) आणि जयसिंग ऊर्फ सोनू रायसिंग पंडित (२६, रा. वाल्मीकनगर, भुसावळ) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साकेगाव मराठी शाळेच्या ग्राउंडवर शाहरुख पटेल हा गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरून विकास लोहार आणि त्यानंतर त्यांना पिस्तुलाची विक्री करणारा जयसिंग यास अटक करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल पवार करीत आहेत.