उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील एका गोडाऊन मध्ये केस्ट्रॉल या नामांकित कंपनी ऑइलची विक्री करणाऱ्या त्रिकुटावर मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार ८१० रुपये किंमतीचे एकूण ३४१ ऑइल बॉटल जप्त करून आधी तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, डर्बी हॉटेल परिसरात राजा महादेव ऑइल नावाची लहान कंपनी आहे. याठिकाणी नामांकित केस्ट्रॉल कंपनीचा लागो वापरून त्याखाली बनावट ऑइल विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी कंपनीवर धाड टाकून नामांकित कंपनीचा लोगो वापरून त्याखाली बनावट ऑइल विक्री करणाऱ्या भारत गुरुदासमल कुकरेजा, नरेश मिल्कीराम अलवानी व अजयकुमार चंद्रभान सिंग या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार ८१० रुपये किंमतीचे एकूण ३४१ बॉटल ऑइल जप्त केल्या. अधिक तपास पोलीस करीत आहेत.