फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:17 IST2021-07-06T14:16:05+5:302021-07-06T14:17:52+5:30
ही घटना केरळच्या कोलम जिल्ह्यातील आहे. इते कल्लूवथुक्कल गावात राहणारी एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली.

फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर....
प्रेम प्रकरणाचे अनेक अजब किस्से तुम्ही वाचले आणि ऐकले असतील. हे किस्से वाचून अनेकदा हैराणी होते तर कधी आपल्याला धक्काही बसतो. अशीच एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. इथे प्रेमासाठी एका महिलेने तिच्या बाळाला सोडलं.
ही घटना केरळच्या कोलम जिल्ह्यातील आहे. इते कल्लूवथुक्कल गावात राहणारी एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून पळून गेली. ज्यानंतर तिच्या दोन नातेवाईकांचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, रेश्माच्या तथाकथित फेसबुक लव्हरचं अकाऊंट तिचे दोन नातेवाईक चालवत होते.
म्हणजे महिलेचे दोन नातेवाईक प्रियकर बनून तिच्यासोबत बोलत होते. जेव्हा या दोघींना वाटलं की गंमत अंगाशी येत आहेत तर पोलिसांकडून पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली. तेच दुसरीकडे रबरच्या शेतात सापडलेल्या नवजात बाळाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अशात बाळाच्या आईला शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अनेक महिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. (हे पण वाचा : धक्कादायक! गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केल्याने मुलाने त्रिशूलने केली वडिलांची हत्या)
ज्यानंतर २२ जूनला रेश्माला अटक करण्यात आली होती. रेश्माने चौकशी दरम्यान सांगितलं की, तिच्या प्रियकराने तिला सांगितलं होतं की तो तिला दुसऱ्याच्या बाळासोबत स्वीकारू शकत नाही. पोलिसांनी तपासातून समजलं की, रेश्मा तिच्या चुलत बहिणीकडून घेतलेल्या सिम कार्डचा वापर करत होती.
पोलिसांना शंका होती की, याच सिमचा वापर फेसबुक फ्रेन्डसोबत संपर्क करण्यासाठी झाला होता. जेव्हा तिला चौकशीसाठी बोलवलं तर ती रेश्माच्या वहिनीच्या मुलीसोबत बेपत्ता झाली. या दोघी मैत्रीणी होत्या. दोघींचे मृतदेह जवळच्या एकी नदीत सापडले.