आर्ची आली अन् चोरट्यांची ‘दिवाळी’ झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 05:56 IST2021-10-24T05:55:43+5:302021-10-24T05:56:00+5:30

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले, तर महागडे मोबाइलही लांबविले. या प्रकरणात गुन्हे मात्र दाखल झाले नव्हते. 

Sairat fame Rinku Rajguru came and the thieves had 'Diwali' | आर्ची आली अन् चोरट्यांची ‘दिवाळी’ झाली

आर्ची आली अन् चोरट्यांची ‘दिवाळी’ झाली

नांदेड : सैराटफेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू ही शनिवारी नांदेडात एका खासगी कार्यक्रमासाठी आली होती. कार्यक्रमात आर्चीला पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी मात्र आपली दिवाळी साजरी करत अनेकांचे खिसे रिकामे केले.

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आपल्या हातसफाईची कला दाखविण्याची संधी गेल्या दोन वर्षांत चोरट्यांनाच मिळालीच नाही. त्यात शनिवारी शहरात आर्ची येणार अन् तिची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई गर्दी करणार याचा पुरेपूर अंदाज चोरट्यांना होता.

त्या दृष्टीने सकाळपासूनच  पाकीटमार तयारीत होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले, तर महागडे मोबाइलही लांबविले. या प्रकरणात गुन्हे मात्र दाखल झाले नव्हते. 

Web Title: Sairat fame Rinku Rajguru came and the thieves had 'Diwali'