शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 06:40 IST

Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देनंबर वन म्हणजे अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब वाझेने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. देशमुखांच्या पुत्राकडून नवी मुंबईत भूखंड खरेदी.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सचिन वाझेकडे केलेल्या चौकशीमध्ये बार मालकाकडे उल्लेख केलेल्या ‘नंबर वन’ व्यक्तीबद्दलचा उलगडा केला असल्याचे समजते. नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांनी जमा केलेले ४.७० कोटी देशमुख यांच्यासाठी होते, या निष्कर्षावर अधिकारी ठाम आहेत.

कारमायकल रोडवरील कारमधील स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे हा गेल्या गेल्या ४ महिन्यांपासून एनआयएच्या ताब्यात आहे.  ईडीने १० ते १२ जुलै या दरम्यान तळोजा कारागृहात जाऊन चौकशी केली आहे. मुंबईतून बार मालकाकडून गेल्या डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ४.७० कोटी वसूल केले होते. त्यासाठी तो ही रक्कम ‘नंबर वन’साठी असल्याचे त्यांना सांगत होता, असा जबाब बार चालकांनी दिला आहे, त्यामुळे ‘नंबर वन’ म्हणजे नेमके कोण आयुक्त की गृहमंत्री, याबद्दल त्यांच्यात संदिग्धता होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वाझेकडे चौकशी केली असता माजी गृहमंत्री यांना उद्देशून उल्लेख केल्याची कबुली दिली आहे, असे सांगण्यात आले. या तपासाची माहिती न्यायालयाकडे दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशमुखांच्या पुत्राकडून नवी मुंबईत भूखंडमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासांतर्गत ईडी त्यांच्या व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्ता व आर्थिक व्यवहाराची पडताळणी करीत आहे. त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नवी मुंबईतील उरण तालुक्यातील धुतुम गावात ८.३ एकर भूखंड खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. पळस्पे फाटा ते जेएनपीटी या महामार्गावरील जागेची किंमत ३०० कोटी असून तो २००६ ते २०१५ या कालावधीत विविध टप्प्यात ग्रामस्थांकडून खरेदी करण्यात आला आहे. प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे हा व्यवहार झाला असून त्यावर सलीलकडून नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबईParam Bir Singhपरम बीर सिंग