शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 13:07 IST

आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वृत्ताचे खंडन करत मल्ल्या भारतात येण्याबाबतची माहिती नाकारली आहे.

ठळक मुद्देमल्ल्या मुंबईत येताच वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे काही अधिकारी मल्ल्याबरोबर विमानात असतील.विजय मल्ल्याचे वकील आनंद दुबे यांना याबाबत खुलासा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच व्हॉट्स अ‍ॅपद्वारे टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मल्ल्याने सांगितले की, फक्त त्यांनाच माहिती ते बोलतात. 

नवी दिल्ली - बुधवारी हजारो कोटींच्या बँकांचे कर्ज घेऊन भारतातून पळून गेलेल्या फरार मद्यसम्राट, उद्योजक विजय मल्ल्याच्या संबंधात मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटन कोणत्याही वेळी विजय मल्ल्यालाभारतात पाठवू शकेल अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्रीच त्यांचे विमान मुंबईत उतरणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वृत्ताचे खंडन करत मल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येण्याबाबतची माहिती नाकारली आहे. अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. ईडीने म्हटले आहे की, ही चुकीची बातमी आहे. अजून या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकेल. मल्ल्या मुंबईत येताच वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे काही अधिकारी मल्ल्याबरोबर विमानात असतील. दिवसा मल्ल्या भारतात आल्यास त्याला विमानतळावरून थेट कोर्टात नेण्यात येईल. सीबीआय आणि ईडी दोन्ही एजन्सी न्यायालयात त्याचा रिमांड मागतील, असे सूत्रांनी सांगितले. विजय मल्ल्याचे वकील आनंद दुबे यांना याबाबत खुलासा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच व्हॉट्स अ‍ॅपद्वारे टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मल्ल्याने सांगितले की, फक्त त्यांनाच माहिती ते बोलतात. 

रात्री मध्यापर्यंत मुंबईत आल्यास विजय मल्ल्याला सीबीआय कार्यालयात थोडा वेळ द्यावा लागेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. यानंतर, दुसर्‍या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. परंतु जर तो दिवसा येथे पोहोचला तर त्याला थेट न्यायालयात हजर केले जाईल. तेथे सीबीआय त्याच्या रिमांडची मागणी करेल. यानंतर ईडी देखील त्याच्या ताब्यात घेण्याची मागणी करेल, अशी माहिती काल समोर आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये, विजय मल्ल्या प्रकरणाची सुनावणी करणार्‍या यूकेच्या कोर्टाने भारतीय चौकशी एजन्सींकडून माहिती मागितली होती की, भारत प्रत्यार्पणानंतर मल्ल्या कोणत्या तुरूंगात ठेवले जातील. यानंतर, तपास यंत्रणांनी मुंबईतील आर्थर रोड जेलच्या एका सेलचा व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की प्रत्यार्पणानंतर मल्ल्या येथे ठेवण्याचा विचार करत आहेत. यावेळी विजय मल्ल्याला प्रत्यार्पणानंतर उच्चस्तरीय सुरक्षा बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

 

विजय माल्या भारतात परततोय; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होणार

 

अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश, सीबीआयच्या जाळ्यात अडकलं रॅकेट

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयVijay Mallyaविजय मल्ल्याIndiaभारत