शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
4
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
5
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
6
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
7
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
8
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
9
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
10
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

...अन् महिला पोलीस ठाण्यातच निरीक्षकाच्या अंगावर धावली; कपडे फाडू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:28 PM

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर

पोलीस ठाण्यात फ्री स्टाईल; निरीक्षकाची कॉलर पकडून थेट गणवेश फाडण्याचा प्रयत्नबागपत: तरुणाला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना एका धक्कादायक घटनेचा सामना करावा लागला. तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. यावेळी एक महिला थेट निरीक्षकावर धावून घेतली. या प्रकरणाचं व्हिडीओ चित्रीकरण करत असलेल्या निरीक्षकासमोर तिनं कपडे फाडण्याचादेखील प्रयत्न केला.  उत्तर प्रदेशच्या बागपतमधील दोघट भागातून पोलिसांनी चोरी प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं. यानंतर तरुणाचे नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी एका महिलेनं थेट पोलीस निरीक्षकाची कॉलर धरली. तिनं निरीक्षकाचा गणवेश फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातून बाहेर काढलं. पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या तरुणाच्या इतर नातेवाईकांनादेखील पोलिसांनी पळवून लावलं. तीन दिवसांपूर्वी दोघट-पुसार मार्गावर तीन-चार जणांनी एका व्यक्तीचे १ हजार रुपये चोरुन पोबारा केला. या प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद प्रकाश, सुशील, रामबीर पोलिसांसह दोघटमधील एका तरुणाच्या घरी पोहोचले. त्यांनी तरुणाला ताब्यात घेताच त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरू केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेजारी जमले. तिथून पोलिसांनी कसाबसा मार्ग काढत तरुणाला घेऊन पोलीस ठाणं गाठलं. मात्र तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.यावेळी एका निरीक्षकानं पोलिसांशी वाद घालणाऱ्या महिलेचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेनं स्वत:चे कपडे फाडण्याचा प्रयत्न सुरू केला. या महिलेनं निरीक्षकाच्या कॉलरला हात घालत त्याचा गणवेश फाडण्याचाही प्रयत्न केला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी लाठीमार करत तरुणाच्या नातेवाईकांना पळवून लावलं. मात्र यामुळे बराच काळ पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण होतं.  

टॅग्स :Policeपोलिस