शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून उकळले १५ लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 19:09 IST

आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक निर्माण करुन महिलेला मिल्क पावडरचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ देवून शारीरिक संबंध ठेवले.

पिंपरी : अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून १५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश भारत पैलवान (रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे मुंबई येथे एकत्र कामाला होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक निर्माण करुन महिलेला मिल्क पावडरचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ देवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेचा व्हिडीओ तयार करण्यासह फोटो काढले. त्यानंतर हा व्हिडीओ व फोटो फिर्यादीस दाखवित ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून वेळोवेळी १५ लाख ५० हजार रुपये खंडणी घेतली. त्यानंतरही महिलेला वारंवार लॉजमध्ये नेवून दारु पाजून फिर्यादीशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याची क्लिप महिलेचे नातेवाईक व मित्र परिवारास व्हॉटसअ‍ॅपद्वारे पाठवून महिलेची बदनामी केली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस