शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
3
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
4
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
5
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
6
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
7
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
8
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
9
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
10
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
11
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
12
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
13
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
14
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
15
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
17
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
18
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
19
IND vs PAK सामना अन् YouTuber चा जीव गेला; एक प्रश्न आणि थेट गोळीबार
20
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी रुबीनाला मुलीच्या निकाहसाठी पॅरोल मंजूर 

By पूनम अपराज | Published: January 03, 2021 7:46 PM

Rubina Memon :  न्यायमूर्ति एसएस शिंदे आणि न्यायमूर्ति अभय आहूजा यांच्या खंडपीठासमोर ३१ डिसेंबर रोजी ही सुनावणी पार पडली. 

ठळक मुद्देपुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अधिक्षकांना रुबीना यांना ६ जानेवारी ते ११ जानेवारी या सहा दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्याचे निर्देश दिले.

मार्च 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपीपैकी एक आणि मास्टरमाईंड टायगर मेमनची वहिनी रुबीना सुलेमान मेमनला मुंबईउच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आपल्या मुलीच्या निकाहला हजर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीमध्ये रुबीनाला पोलीस बंदोबस्तात ६ दिवसांचा पॅरोल मंजूर केला. न्यायमूर्ति एसएस शिंदे आणि न्यायमूर्ति अभय आहूजा यांच्या खंडपीठासमोर ३१ डिसेंबर रोजी ही सुनावणी पार पडली. 

 

२००६ साली विशेष टाडा न्यायालयाने रुबीनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आऱोपी टायगर मेमनसोबत कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून टाडा न्यायालयाने रुबीनाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून रुबीना येरवडा मध्यवर्ती कारागृहात (महिला कक्षात) शिक्षा भोगत आहे. ८ जानेवारी रोजी आलिया या आपल्या मुलीच्या निकाहसाठी पॅरोल देण्यात यावा म्हणून रुबीनाने वकील फरहाना शहामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुट्टीकालीन न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांना आपल्या मुलीच्या लग्नासंबंधित विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किमान ७ दिवसांची रजा मंजूर करण्यात यावी अशी विनंती खंडपीठासमोर करण्यात आली. तसेच रुबिना १३ वर्षांहून अधिक काळ येरवडा कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत आहेत. 

 

यापूर्वी त्यांना कधीच पॅरोलवर सोडण्यात आले नसल्याचेही वकील शहा यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले. तेव्हा, याचिकाकर्त्याच्या वर्तनाबद्दल मध्यवर्ती कारागृहातील राज्य सरकारी वकिलांकडे खंडपीठाने विचारणा केली होती. याचिकाकर्त्याच्या वर्तनाबद्दल पोलिसांचा खंडपीठाकडे अहवाल सादर करण्यात आला. त्याची दखल घेत मुलीच्या लग्नासाठी मानवतेच्या दृष्टीने याचिकाकर्त्यांची याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आणि पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अधिक्षकांना रुबीना यांना ६ जानेवारी ते ११ जानेवारी या सहा दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्यांना ५ जानेवारीपर्यंत १ लाख रूपये अनामत रक्कम जमा करण्याचे सांगत १२ जानेवारी रोजी पुन्हा येरवडा पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देत सुनावणी १९ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

१२ मार्च 1993 रोजी मुंबईतील १३ विविध परिसरात बॉम्बस्फोट करण्यात आले होते. त्यात २५७ लोकांचा मृत्यू आणि सुमारे १४०० लोक जखमी झाले होते. या स्फोटांचे मुख्य सूत्रधारांमध्ये याकुब मेमन आणि टायगर मेमन यांचा समावेश होता. २०१५ मध्ये याकूब मेमन याला फाशी देण्यात आली होती. तर दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहीम यांसह एकूण २७ आरोपी अजूनही फरार आहेत.  

टॅग्स :Blastस्फोटPuneपुणेHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईParolaपारोळा