Rs. 34 lakhs bitten by flat flats; The suspect arrested | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; संशयिताला अटक
फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; संशयिताला अटक

ठळक मुद्दे फातोर्डा येथील पाश्कोल फर्नाडीस हे तक्रारदार आहेत. 28 मे 2015 ते 30 जून 2015 दरम्यान हा सौदा झाला होता. यासंबंधी पाश्कोल यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली होती.

मडगाव - फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने गोव्यातील फातोर्डा येथील एका दांपत्याला 34 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी आग्नेलो सिप्लिसियो कादरेज (46) याला आज अटक केली. दक्षिण गोव्यातील मायणा - कुडतरी पोलिसांनी ही कारवाई केली. मागाहून संशयिताला न्यायालयात उभे केले असता त्याला पंचवीस हजारांच्या हमीवर जामीन मंजूर झाला.

फातोर्डा येथील पाश्कोल फर्नाडीस हे तक्रारदार आहेत. संशयिताने पाश्कोल व त्याची पत्नी कॅरिना फर्नाडीस यांना गंडा घातला.भारतीय दंड संहितच्या 420 कलमाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर पुढील तपास करीत आहे. पाश्कोल हे आखातात कामाला असतात, संशयिताने वार्का येथे वन बीएके फ्लॅट विकत देण्याचे असल्याचे सांगितले. त्यासाठी 34 लाख रुपयेही तक्रारदाराकडून घेतले. 28 मे 2015 ते 30 जून 2015 दरम्यान हा सौदा झाला होता. मात्र नंतर प्रत्यक्षात फ्लॅट दिलाच गेला नसल्याने आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर यासंबंधी पाश्कोल यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली होती.

 

 

 

 

 


Web Title: Rs. 34 lakhs bitten by flat flats; The suspect arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.