शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राेहा बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 18:46 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देविशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने पिडीतेला न्याय मिळणार असल्याचा विश्र्वास पिडीतेच्या कुटूंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

रायगड - रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती. या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.26 जुलै रोजी तांबडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी (24 ऑगस्ट) या घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. तांबडी येथील घटना ही दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी भेट घेतली हाेती. त्यांनी याबाबतची मागणी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने पिडीतेला न्याय मिळणार असल्याचा विश्र्वास पिडीतेच्या कुटूंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर उपस्थित होते.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

 

'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयadvocateवकिलHome Ministryगृह मंत्रालयAnil Deshmukhअनिल देशमुख