सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:55 IST2019-10-01T20:53:35+5:302019-10-01T20:55:34+5:30

या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Robbery at a retired naval officer's home | सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरात चोरी

सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरात चोरी

ठळक मुद्दे२५ तारखेला ते घरी परतले, तेव्हा घराला टाळे होते. टाळे उघडून घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

मुंबई - सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घर चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये बशीर मगदूम (५९) राहतात. ते नौदलातून सेवानिवृत्त झाले असून, सध्या कांदिवलीत स्विमिंग पूल इन्चार्ज म्हणून नोकरी करतात. २१ तारखेला ते गावी वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. २५ तारखेला ते घरी परतले, तेव्हा घराला टाळे होते.
टाळे उघडून घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यानुसार, त्यांनी बेडरूममधील कपाट तपासले असता, कपाटातून ४ लाख ८२ हजार रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, कपाटातील सोन्याचे दागिने व्यवस्थित होते, पण ड्रॉवरमध्ये ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे त्यांना सापडली नाहीत.
बंद घराचा फायदा घेत चोरांनी कपाटातील रकमेवर हात साफ केल्याचे लक्षात येताच, या प्रकरणी त्यांनी समतानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Robbery at a retired naval officer's home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.