शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
4
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
5
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
6
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
7
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
8
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
9
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
10
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
11
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
12
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
13
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
14
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
15
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
16
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
17
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
18
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
19
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
20
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."

GST असिस्टंट कमिशनरच्या फ्लॅटमध्ये झाली चोरी; दोघांना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 8:08 PM

Robbery Case : आरोपींच्या ताब्यातून 7.50 लाख रोकड, चोरीच्या पैशांसह खरेदी केलेले ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली ऑटो आणि कंपास जीप जप्त केली.

ठळक मुद्देपोलिसांनी प्रतापगड येथील चोरट्या राजेश सरोज आणि चोरीचा माल विकत घेतलेला सोनार संतोष केसरवाणी यांना अटक केली.

लखनऊ - ५ मे रोजी रात्री गोमती नगर विस्ताराच्या सरयू अपार्टमेंटमध्ये राहणारे जीएसटीचे सहायक आयुक्त संजय शुक्ला यांच्या फ्लॅटमध्ये लाखोंची चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 7.50 लाख रोकड, चोरीच्या पैशांसह खरेदी केलेले ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली ऑटो आणि कंपास जीप जप्त केली.डीसीपी पूर्व संजीव सुमन यांनी सांगितले की, ५ मे रोजी सरयू अपार्टमेंटमध्ये चोरीच्या प्रकरणात चोरांचे काही सीसीटीव्ही फुटेज सापडले, त्या आधारे तपासणीनंतर चोरांची ओळख पटली. पोलिसांनी प्रतापगड येथील चोरट्या राजेश सरोज आणि चोरीचा माल विकत घेतलेला सोनार संतोष केसरवाणी यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, ५ मेच्या रात्री पाच चोरट्यांनी सरयू अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला होता आणि लिफ्टमधून वरच्या मजल्यावर गेले होते. लिफ्टच्या समोरील फ्लॅटच्या दारात अनेक वर्तमानपत्रे पडलेली पाहिल्यानंतर त्यांना कळले की फ्लॅट रिक्त आहे.

आरोपींनी सदनिकेचे कुलूप तोडून संपूर्ण घर साफ केले. जीएसटीचे सहायक आयुक्त संजय शुक्ला यांच्या त्या फ्लॅटमधून आरोपींनी लाखो रुपयांचा माल चोरून नेला. चोरीनंतर अपार्टमेंटजवळ पार्क केलेल्या जीप कंपासमध्ये बसून आरोपी पळून गेले. डीसीपी म्हणाले की, अनेक लोकांना सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यानंतर छापा मारल्यानंतर अटक करण्यात आलेल्या कुख्यात चोर राजेश सरोजची माहिती मिळाली, तीन आरोपी अद्याप फरार आहेत ज्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरीGSTजीएसटीcommissionerआयुक्त