शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, जबरी चोरी करणारे तिघे सातारा जिल्ह्यातून हद्दपार, उंब्रजमध्ये गुन्हे; सुधारण्याची संधी देऊनही फरक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 22:52 IST

टोळीचा प्रमुख शाहीद उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय २८), शाहरुख शब्बीर मुल्ला (वय २९, दोघेही रा. कोणेगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा), अमित अंकुश यादव (वय ३६, रा. कवठे, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

सातारा :  कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तीन सराईतांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली.

टोळीचा प्रमुख शाहीद उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय २८), शाहरुख शब्बीर मुल्ला (वय २९, दोघेही रा. कोणेगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा), अमित अंकुश यादव (वय ३६, रा. कवठे, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली होती. त्यांना कायद्याचा धाक नसून ते बेकायदा कारवाया करत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले होते. त्यांना अनेकदा सुधारण्याची संधी देण्यात आली. परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. 

उंब्रज पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी या तिघांवर हद्दपारीची कारवाई व्हावी, यासाठी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने मंजुरी देऊन तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, पोलिस काॅन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलिस अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. त्यामुळे वरील तिघांवर हद्दपारीची कारवाई झाली.वर्षभरात १९ जण हद्दपार... नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत सात उपद्रवी टोळ्यांमधील १९ जणांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्याविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस