शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

चहावाल्याने दिली होती लुटारूंना टीप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 2:48 PM

पेट्रोल पंपाची रोकड लुटून नेणाऱ्या टोळीला अटक

ठळक मुद्दे याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली मुरबाड रोडवरील विजय बाग परिसरात हा गुन्हा घडला होता.

कल्याण - पेट्रोल पंपाची रोकड लुटून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून चहावाल्याने दिलेल्या टिपच्या आधारावर आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या महिन्यात ३१ तारखेला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुरबाड रोडवरील विजय बाग परिसरात हा गुन्हा घडला होता. पेट्रोल पंपावर जमा होणारी १२ लाख ४० हजारांची रोकड आणि सव्वातीन लाखांचे ४ चेक घेऊन प्रदीप सिंह हे बँकेत भरण्यासाठी चालले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या हातातील बॅग खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही माहिती नसताना तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकल्या.यातील मुख्य आरोपी सचिन विनोद शिरोडकर, सोमनाथ उर्फ गणेश खंडागळे, नितीन पवार, रुपेश रमेश म्हात्रे, सोनू दिलीप सुरवसे आणि वैभव विलास भास्कर या 6 जणांना अटक केली. विशेष म्हणजे मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही कराळे यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, सुरेश डांबरे, अविनाश पाळदे (अँटी रॉबरी स्कॉड), पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक निकाळे, भालेराव, सुनिल पवार, दळवी, चौधरी, भणगे, पोलीस शिपाई गोसावी, पवार, अँटी रॉबरी स्कॉडचे पोलीस नाईक सुनिल पवार, अमोल गोरे, नरेंद्र बागुल, रुपेश सावळे, दिपक गडगे, चिंतामण कातकडे, पोलीस शिपाई रविंद्र हासे, गावित, पिंजारी, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे सपोउनि पवार, पोलीस नाईक शिर्के, माने, ठिकेकर  आदींच्या पथकाने केली. 

टॅग्स :RobberyदरोडाPetrol Pumpपेट्रोल पंपDacoityदरोडाPoliceपोलिसArrestअटक