बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एक भयंकर घटना घडली आहे. दरोडेखोरांनी घरात घुसून एका इंजिनिअरची हत्या केली. ही घटना मादीपूरमधील रामराजी रोडवर घडली. इंजिनिअर मोहम्मद मुमताजला दरोडेखोरांनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर चाकूने वार केले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले शहर एसपी कोटा किरण कुमार म्हणाले की, मोहम्मद सोबत त्याची पत्नी आणि तीन मुलं घरी होती. घरातून रोख रक्कम आणि दागिने लुटण्यात आले आहे. गुन्हेगारांनी घरात बसवलेल्या सीसीटीव्हीची हार्ड डिस्क पळवून नेली.
मोहम्मद वैशालीच्या भगवानपूर ब्लॉकमध्ये काम करत होता आणि पत्नी, तीन मुलांसह मादीपूरमध्ये राहत होता. त्याचं घर पहिल्या मजल्यावर आहे. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गुन्हेगारांनी बाल्कनीतून घरात प्रवेश केला. मोहम्मदवर त्याची पत्नी आणि मुलांसमोर चाकूने वार करण्यात आले. स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच शहर एसपी कोटा किरण कुमार, शहर डीएसपी सीमा देवी हे घटनास्थळी पोहोचले. पत्नी आणि मुलांची चौकशी करून घटनेची माहिती घेण्यात आली. खोलीतून दागिने आणि रोख रक्कम गायब आहे. गुन्हेगारांनी त्यांच्यासोबत मोबाईल आणि सीसीटीव्ही हार्ड डिस्क पळवून नेली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.