एका हॉटेलसह दोन दुकाने फोडून चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 19:12 IST2019-11-18T17:36:08+5:302019-11-18T19:12:11+5:30
याप्रकरणी फर्नांडिस यांनी रविवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

एका हॉटेलसह दोन दुकाने फोडून चोरी
कल्याण - पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरात असलेल्या एका हॉटेलसह दोन दुकाने चोरट्यांनी फोडून दुकानातील आईस्क्रिम आणि रोख रक्कम असा सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरटयांनी लांबवला.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या वॉल्टर फर्नांडिस यांचे बिर्ला महाविद्यालय येथील चिंतामणी कॉलनीमध्ये डि.जे. हॉल नावाचे हॉटेल आहे. फर्नांडिस यांनी शनिवारी हॉटेल बंद केल्यानंतर दोन चोरटयांनी त्यांच्या हॉटेलमधील रोख रक्कम आणि शीतपेयाचे बॉक्स असा ४१०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. त्यानंतर हॉटेलच्या शेजारी असलेले मनोज फडतरे यांच्या मनपसंत आईस्क्रिम आणि झेरॉक्सच्या दुकानातून शीतपेय आणि आईस्क्रिम असा सुमारे साडेपाच हजारांचा मुद्देमाल लांबवला. तसेच, सचिन तिवारी यांच्या जय महाराष्ट्र झेरॉक्सच्या दुकानातून सहाशे रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी फर्नांडिस यांनी रविवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.