हातचलाखीने ५० मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 21:17 IST2019-08-26T21:15:22+5:302019-08-26T21:17:00+5:30
सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरटा गजाआड

हातचलाखीने ५० मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड
कल्याण - हातचलाखीने नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्हीच्या साहाय्याने कल्याण महात्मा फुले पोलिसांनीअटक केली आहे. शारिक शेख असे चोरट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत तब्बल 50 जणांना आपले लक्ष्य बनवले आहे.
बेसावध असलेल्या नागरिकांना हे चोरटे आपले लक्ष करत होते. कल्याणमध्ये अशा प्रकारच्या घटना मध्ये वाढ झाली होती .कल्याण स्टेशन परिसर विशेषतः बस डेपो मध्ये या घटना घडल्या होत्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास सुरू केला या प्रकरणी पोलिसांनी शारिक शेखला अटक केली आहे. शारिकने एकूण 50 घटना केल्या असून त्याच्याकडून 28 मोबाईल हस्तगत केले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.