शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

व्हॉट्सअ‍ॅप कोड पडताळणीचे मेसेजचा धोका; सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 1:05 AM

Cyber Crime: सहा अंकी कोड हॅकर्सला देणे धोक्याचे

औरंगाबाद : व्हॉट्सअ‍ॅपची पडताळणी करायची असल्याचे सांगून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याला सहा अंकी मेसेज (व्हेरिफिकेशन कोड) पाठवून तो कोड विचारून घेत व्हॉट्सअ‍ॅपवर ताबा (अ‍ॅक्सेस ) घेण्याचा नवीन फंडा सायबर गुन्हेगार वापरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा अधिकृत मेसेज असल्याचे समजून शहरातील अनेकांनी त्यांना आलेला सहा अंकी नंबर हॅकर्सला पाठविल्याने त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक झाले.

व्हॉट्सअ‍ॅपकडून अशी कोणतीही पडताळणी केली जात नसल्याने, अशा मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हजारो व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना We have sent you a request for identity verification. The digit verification is used to activated a whatsapp account on a new deviceअसा मेसेज प्राप्त होत आहे.

हा मेसेज खरा वाटावा याकरिता हॅकर्स मेसेजमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे आयकॉन दर्शवितात. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने मेसेज पाठवल्याचे समजून मोबाईलवर आलेला सहा अंकी कोड मेसेज अनेक जण परत (हॅकर्सला ) पाठवतात. हा कोड प्राप्त होताच हॅकरला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप खात्याचा अ‍ॅक्सेस प्राप्त होतो . सायबर तज्ज्ञ निरंजन चाबुकस्वार यांनी सहा अंकी कोड हॅकर्सला देणे वापरकर्त्यासाठी धोक्याचे असल्याचे नमूद केले. हॅकर्स अ‍ॅक्सेस मिळवून त्या व्हॉट्सअ‍ॅपमधील डाटा, वैयक्तिक माहिती, छायाचित्र, व्हिडिओ आणि मित्रांची माहिती चोरतात. हॅकर तुमच्या मित्रांना असे व्हेरिफिकेशन कोडचे मेसेज पाठवितात आणि त्यांचेही व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही व्हेरिफिकेशन कोड शेअर केला असेल तर तात्काळ व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या मोबाईल नंबरची पुन्हा पडताळणी करा आणि नवीन कोड मिळवून पोलिसांशी संपर्क साधावा.हॅकर्स कशी करतात फसवणूकव्हॉट्सअ‍ॅप हॅक केल्यानंतर त्याच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांच्या नंबरवर हॅकर्स तुमच्या अकाउंटवरून सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवतात. चुकून मेसेज तुला पाठवला आहे तो मेसेज परत पाठव, असे सांगतात. मित्राच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज असल्याचे समजून तो सहा अंकी क्रमांक परत पाठविताच तो मित्रही हॅकर्सची शिकार होतो. त्याचाही व्हॉट्सअ‍ॅप हॅक होतो. असे सायबर तज्ज्ञ शैलेश दहिवाल यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम