Rinku Sharma Murder Case : राम मंदिरासाठी निधी जमा करत होता म्हणून केली गेली रिंकूची हत्या? 

By पूनम अपराज | Published: February 12, 2021 09:23 PM2021-02-12T21:23:57+5:302021-02-12T21:26:01+5:30

Rinku Sharma Murder Case : वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणाचा परिणाम म्हणून हि हत्या झाल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु रिंकूचे कुटुंबीय आणि विश्व हिंदू परिषद वेगवेगळे आरोप करत आहेत.

Rinku Sharma Murder Case : Was Rinku killed for raising funds for Ram temple? | Rinku Sharma Murder Case : राम मंदिरासाठी निधी जमा करत होता म्हणून केली गेली रिंकूची हत्या? 

Rinku Sharma Murder Case : राम मंदिरासाठी निधी जमा करत होता म्हणून केली गेली रिंकूची हत्या? 

googlenewsNext
ठळक मुद्देरिंकू आणि त्याच्या मित्रांसह आरोपींनी एकत्रितपणे जवळच्या रोहिणी सेक्टर -२ मध्ये गेल्या वर्षी रेस्टॉरंट्स उघडले. जेव्हा त्यांचा व्यवसाय अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी एकमेकांवर दोषारोप सुरू केले.रिंकूच्या हत्याबाबतन्यायाची मागणी करणार्‍यांमध्ये कंगना रनौत, प्रणिता सुभाष, आंध्र प्रदेश भाजपाचे महासचिव एस. के. विष्णुवर्धन रेड्डी, यू ट्यूबर एल्विश यादव इत्यादींचा समावेश आहे.

10 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका २५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. रिंकू शर्मा असे मृताचे नाव आहे. रात्री मुलाच्या घरात मारकऱ्यांची गॅंग घुसली असल्याचा आरोप रिंकू कुटुंबियांनी केला आहे. रिंकूला काठीने मारा, जो कोणी वाचवण्यासाठी येईल त्यालाही मारहाण करा, असं म्हणत रिंकूलाही रस्त्यावर फरफटत ओढले. त्याच्या पाठीत चाकूने वार केले गेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि जाहिद, महताब, नसीरुद्दीन, तजुद्दीन आणि इस्लाम या पाच आरोपींना अटक केली. वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणाचा परिणाम म्हणून हि हत्या झाल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु रिंकूचे कुटुंबीय आणि विश्व हिंदू परिषद वेगवेगळे आरोप करत आहेत.

Rinku Sharma Murder Case : ज्याच्या पत्नीला रक्तदान करून दिलं जीवदान; 'त्याच' इस्लामने घेतले रिंकू शर्माचे प्राण?

 

पोलिसांनी भांडणातून हत्या झाल्याचं सांगितलं 
सुरुवातीच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, रिंकूचा वाढदिवसाच्या पार्टीत आरोपींशी वाद झाला होता. त्यानंतर त्याने रिंकूच्या घरावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण धंद्यातील भांडणाशी संबंधित आहे. रिंकू आणि त्याच्या मित्रांसह आरोपींनी एकत्रितपणे जवळच्या रोहिणी सेक्टर -२ मध्ये गेल्या वर्षी रेस्टॉरंट्स उघडले. जेव्हा त्यांचा व्यवसाय अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी एकमेकांवर दोषारोप सुरू केले.



अतिरिक्त डीसीपी (आउटर ) सुधांशु धाम इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले-

10 फेब्रुवारीच्या रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पीडित व आरोपी यांच्यात हॉटेल व्यवसायावरून वाद झाला. यानंतर ते घरी गेले. परंतु नंतर हे चारही आरोपी रिंकू शर्माच्या घरी पोहोचले. शर्मा आणि त्याचा भाऊ घराबाहेर होते. यानंतर पुन्हा जोरदार वादविवाद झाला आणि भांडण वाढले. यानंतर आरोपीने रिंकूवर वार करून पळ काढला.

अतिरिक्त डीसीपी सुधांशु यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, या भांडणाचा व्हिडिओही सापडला आहे. ज्यामध्ये एक मुलगा चाकू घेताना दिसत आहे. सुधांशु असेही म्हणाले की, या घटनेबाबत अनेक अफवा सुरू आहेत. हे सर्व लोक एकाच परिसरात राहत होते आणि एकमेकांना ओळखत होते.

'मारहाण केली, रस्त्यावर खेचले'
रिंकूचा भाऊ मनु शर्मा हा विश्व हिंदू परिषदेच्या युवा संघटनेचा सदस्य आहे. मनु शर्मा म्हणाले की, रिंकू प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करायचा. १० फेब्रुवारी रोजी रात्री रिंकूने घरी आल्यावर मला सर्व दरवाजे बंद करण्यास सांगितले. मला हे करता येईपर्यंत बरीच मुले आमच्या घरी आली होती. आम्हाला काठीने मारहाण केली. माझ्या पालकांना त्रास दिला. मलाही मारहाण केली आणि माझ्या भावाला रस्त्यावर ओढले आणि त्याच्यावर वार केले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मनु शर्मा यांनी आरोप केला की, गेल्या वर्षभरापासून आरोपींमध्ये भांडणं सुरु आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. त्या लोकांना (आरोपी) याचा राग आला. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही नेहमीच चांगले शेजारी आहोत. आरोपीची एक पत्नी गरोदर राहिल्यानंतर रिंकूनेही तिच्यासाठी रक्त दिले. पोलिसांनी व्यवसायातून झालेल्या भांडणांबाबत मनु म्हणाले की, आमचे रेस्टॉरंट नाही.



राम मंदिर वर्गणीचा अँगल 
विश्व हिंदू परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी रिंकू शर्माची हत्या करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे मत विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केले. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की, रिंकूचा भाऊ विहिंप युवा संघटनेचा सदस्य असून अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करण्याचा कामात रिंकू सक्रियपणे भाग घेत होती.

सोशल मीडियावर न्याय मिळावा अशी मागणी
ट्विटरवर रिंकू शर्माला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.  #JusticeForRinkuSharma टॉप ट्रेंड करीत आहे. #HindusLivesMatter हॅशटॅग देखील खूप वापरला जात आहे. अनेक सेलिब्रेटींनीही याबाबत आपले मत व्यक्त करून न्यायाची मागणी केली. रिंकूच्या हत्याबाबतन्यायाची मागणी करणार्‍यांमध्ये कंगना रनौत, प्रणिता सुभाष, आंध्र प्रदेश भाजपाचे महासचिव एस. के. विष्णुवर्धन रेड्डी, यू ट्यूबर एल्विश यादव इत्यादींचा समावेश आहे.

Web Title: Rinku Sharma Murder Case : Was Rinku killed for raising funds for Ram temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.