सामूहिक अत्याचार करणारा रिक्षाचालक गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:29 IST2019-05-03T18:27:48+5:302019-05-03T18:29:47+5:30
एक जण अटकेत तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस

सामूहिक अत्याचार करणारा रिक्षाचालक गजाआड
नालासोपारा - विरार पूर्वेकडे एप्रिल महिन्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी विरारपोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. तसेच त्याचा दुसरा साथीदार फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे.
विरारच्या सहकार नगरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधून १५ एप्रिलच्या रात्री दोन अनोळखी तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. अत्याचार करणाऱ्या आरोपीनी दोघांनाही कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. मागील १४ दिवसांपासून फरार असलेला व विरारच्या सहकार नगरमध्ये रिक्षाचालवणारा आरोपी सुधाकर सुळे (२६) याला सोलापूर येथून अटक केले आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याचा दुसरा साथीदार बलराम अद्याप फरार असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. घनदाट यांनी लोकमतला सांगितले आहे.