पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 21:48 IST2018-07-13T21:48:09+5:302018-07-13T21:48:33+5:30
चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकाला मारहाण
मुंबई - रिक्षा पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना चारकोप येथे घडली आहे. कांदिवली पश्चिम येथील भाब्रेकर नगरमधील एसीजी फार्मा कंपनीच्यासमोर चार अनोळखी इसमांनी अरविंद गिरी (वय - ३४) यांना रिक्षा पार्किंग केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून बांबूने जबर मारहाण केली. या मारहाणीत गिरी यांना फॅक्चर झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी चारकोप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.