शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, धावत्या रिक्षातून उडी मारत केला बचाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 19:17 IST

सहा आसनी रिक्षातील हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात तरुणी एकटीच होती..

ठळक मुद्देतरुणीने पोलिसांकडे सहा आसनी रिक्षा चालकाचे दिले वर्णन ; रिक्षाचालकाचा शोध सुरू

पुणे : सहा आसनी रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावर घडला. या प्रसंगातून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुणीने रिक्षातून उडी मारली. यात तिला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली.याप्रकरणी धायरी येथील २३ वर्षाच्या तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालकालाचा पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या रविवारी रात्री स्वारगेट ते नºहे दरम्यान ही घटना घडली़ तक्रारदार तरुणी नृत्य प्रशिक्षण घेत आहे. पुणे स्टेशन भागात वर्ग आहे. ही तरुणी स्वारगेट परिसरातून सहा आसनी रिक्षातून धायरीला जात होती. सहा आसनी रिक्षातील हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात तरुणी एकटीच होती. रिक्षा चालकाने सिंहगड रस्त्याने धायरीच्या दिशेने नेण्याऐवजी कालव्याच्या रस्त्याने रिक्षा नेली. कालव्याच्या रस्त्याने रिक्षा चालक पुन्हा सिंहगड रस्ता भागात आला आणि मुंबई-बंगळुरु बाहयवळण मार्गाच्या दिशेने रिक्षा नेली. त्यामुळे तरुणीला संशय आला. तेव्हा त्याने नऱ्हे भागात काम आहे, दहा मिनिटात धायरीला सोडतो, असे सांगितले़ त्यामुळे या तरुणीने रिक्षाचालकाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला़  तेव्हा रिक्षाचालकाने तिच्या चेहऱ्यावर गुंडाळलेला रुमाल ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून तिने रिक्षातून उडी मारली. त्यानंतर तिने तिच्या मित्राशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या तरुणीने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तरुणीने पोलिसांकडे सहा आसनी रिक्षा चालकाचे वर्णन दिले. रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा