तृतीयपंथीवर चाकू हल्ला करणारा रिक्षा चालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 16:56 IST2020-07-05T16:56:19+5:302020-07-05T16:56:38+5:30

शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक विरोधात गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा रिक्षाचालकास शहर पोलीसांनी अटक केली. 

Rickshaw driver arrested for stabbing transgender | तृतीयपंथीवर चाकू हल्ला करणारा रिक्षा चालक अटकेत

तृतीयपंथीवर चाकू हल्ला करणारा रिक्षा चालक अटकेत

जळगाव : तृतीयपंथीवर चाकू हल्ला करणारा हेमंत नानकराम गुजर या रिक्षा चालकाला शहर पोलिसांनी शनिवारी अटक केली.

त्याच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तृतीयपंथी अर्चनाजान या सहकारी राशीजान, कल्याणीजान व जमन्नाजान अशांसह गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर एकत्र राहतात. बाहेर जायचे असल्यास ते सर्व जन रिक्षाचालक हेमंत नानकराम गुजर यालाच बोलावतात. ३ि जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास चौघींना बाहेर जायचे असल्याने त्यांनी हेमंतला बोलावले. त्यावेळी रिक्षाचालक मद्याच्या नशेत होता.

यावेळी अर्चनाजानने मद्यप्रशानक करुन का आला? असे विचारले असता त्याचा राग येऊन रिक्षाचालकाने शिवीगाळ करुन अर्चना जानच्या छातीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक विरोधात गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा रिक्षाचालकास शहर पोलीसांनी अटक केली. 
 

Web Title: Rickshaw driver arrested for stabbing transgender

टॅग्स :Jalgaonजळगाव