शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रिया चक्रवर्ती आरोपी नं. १०; सुशांत सिंह राजपूत प्रकरणात NCB ने दाखल केले आरोपपत्र 

By पूनम अपराज | Published: March 05, 2021 3:22 PM

Sushant Singh Rajput Drug connection NCB filed Chargesheet : मुंबई एनसीबी टीमनं मुंबई सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं आहे.

ठळक मुद्दे 30 हजार पानांच्या दोषारोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे.या दोषरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आरोपी नं. १० असल्याची माहिती

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले कुटुंब आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) शुक्रवारी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करणार आहे. अभिनेत्याच्या मृत्यूच्या प्रकरणात एनसीबी ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांनी मुंबईसत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. ही चार्जशीट जवळपास ३० हजार पानांची आहे. 30 हजार पानांच्या दोषारोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे.या दोषरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आरोपी नं. १० असल्याची माहिती आज तकने दिली आहे.  

रिया आणि शौविकची आरोपपत्रात नावे

14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह वांद्रे येथील त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये सापडला. या प्रकरणात ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीने त्याचा तपास सुरू केला. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ते ड्रग पेडलर्सपासून सुशांतच्या मॅनेजरपर्यंत चौकशी केल्यानंतर रिया आणि तिच्या भावाला एनसीबीने अटक केली. रिया चक्रवर्ती तुरुंगात जवळपास महिनाभर घालविल्यानंतर जामिनावर सुटली आहे. रिया चक्रवर्तीशिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचेही नाव एनसीबीच्या आरोपपत्रात आहे. आरोपपत्रात ३३ जणांची नावे 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने आपल्या आरोपपत्रात ३३ जणांची नावे दिली आहेत. रिया चक्रवर्ती आणि शौविक व्यतिरिक्त यात अनेक ड्रग पेडलर्सची नावे आहेत. यातील बहुतेक ड्रग पेडलरना एनसीबीने चौकशीदरम्यान अटक केली होती.

बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी ड्रग्सचं कनेक्शन 

 तपासणी दरम्यान ड्रग्स माफियांशी बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींशी कनेक्शन जोडले गेलेले आढळले. या ख्यातनाम व्यक्तींची नावे ड्रग्स पेडलर्स यांच्या चौकशीदरम्यान समोर आली. त्यानंतर एनसीबीने दीपिका पादुकोण ते सारा अली खान आणि रकुल प्रीतसिंग ते  मधु मंटेना यांची  या प्रकरणांची चौकशी केली. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्यांच्या व्यवस्थापकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत चौकशी केली होती. या चौकशी आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे रिया आणि शौविक यांना अटक करण्यात आली. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.एनसीबीने रियावर हे आरोप केले आहेत

रिया आणि शौविक यांच्यावर सुशांतला ड्रग्स पुरविल्याचा आरोप आहे. तथापि, उच्च न्यायालयात रियाला जामीन देताना कोर्टानेही कबूल केले की, रियाने स्वतःहून ड्रग्स विकत घेतले किंवा विकले असा कोणताही पुरावा एनसीबीकडे नाही. रियाने आपल्या जबाबात असेही म्हटले आहे की, तिने सुशांतला केवळ त्याच्या सांगण्यावरून ड्रग्स दिले. यासाठी सुशांतने पैसे दिले आणि ड्रग्स पेडलर्सची माहिती सुशांतनेही दिली. रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पेडलर्सशी थेट संपर्कात होता.

ईडी चौकशीदरम्यान उघड झाले ड्रग चॅट 

या प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफआयआर नोंदविला होता. सुशांत केसमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणारे एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) यांना रिया आणि शौविकच्या फोनवर ड्रग्स चॅट मिळाले. ईडीने एनसीबीला ही माहिती दिली होती, त्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या ड्रग चॅटमध्ये सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा ते दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरंडा अशी नावे होती.रिया, शौविक, दीपेश आणि सॅम्युअल यांनी जामिनावर सुटका केली

तपासादरम्यान एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांना ड्रग्ज पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली. हे सर्व सध्या जामिनावर सुटले आहेत.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSessions Courtसत्र न्यायालयMumbaiमुंबईRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती