"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:42 IST2025-12-12T15:41:54+5:302025-12-12T15:42:50+5:30
एका विकृत पतीने पत्नीसोबतच्या खासगी गोष्टींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील रीवा येथे एक भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. पॉर्न फिल्म पाहण्याची सवय असलेल्या एका विकृत पतीने पत्नीसोबतच्या खासगी गोष्टींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घृणास्पद कृत्याबद्दल त्या विकृत पतीला कोणताही पश्चात्ताप नाही. उलट तो पत्नीला सांगत आहे की, त्याने जाणूनबुजून हे कृत्य केलं आहे, जेणेकरून तो 'फेमस' होऊ शकेल. आरोपी पॉर्न फिल्ममधील पात्रांना आपला आदर्श मानतो आणि त्यांच्यासारखं बनू इच्छितो.
या संपूर्ण प्रकरणामुळे पत्नीला मोठा धक्का बसला आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, पतीने १३ मिनिटं १४ सेकंदांचा हा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो मित्र आणि नातेवाईकांना पाठवला आहे. आता तिला सर्व बाजूंनी फोन येत आहेत. ती म्हणाली की, तिचा पती माणूस नाही तर नराधम आहे.
महिलेच्या भावाचा आरोप आहे की, लग्नाच्या वेळी आरोपीने हुंड्याची मागणी केली होती. हुंड्याची पूर्ण रक्कम न मिळाल्यानेही तो चिडलेला असायचा. त्याने हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने बदला घेण्याच्या उद्देशाने हे सर्व केलं असावे, असा आरोप केला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचं लोकेशन मुंबईत ट्रेस करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.