न्यायालयात सुरू असलेला खटमा मागे घेण्याची धमकी देत फिर्यादीच्या डोक्याला लावला रिव्हॉल्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:33 IST2019-05-05T01:33:17+5:302019-05-05T01:33:43+5:30

जळगाव - न्यायालयात सुरू असलेला खुनाच्या गुन्ह्याचा  खटला मागे घ्यावा यासाठी भूषण वासुदेव सोनवणे (रा.रामेश्वर कालनी )याने छातीला व डोक्याला रिव्हाल्वर लावून ...

The revolver was brought to the plaintiff's head, threatening to withdraw the trial that started in court | न्यायालयात सुरू असलेला खटमा मागे घेण्याची धमकी देत फिर्यादीच्या डोक्याला लावला रिव्हॉल्वर

न्यायालयात सुरू असलेला खटमा मागे घेण्याची धमकी देत फिर्यादीच्या डोक्याला लावला रिव्हॉल्वर

जळगाव - न्यायालयात सुरू असलेला खुनाच्या गुन्ह्याचा  खटला मागे घ्यावा यासाठी भूषण वासुदेव सोनवणे (रा.रामेश्वर कालनी )याने छातीला व डोक्याला रिव्हाल्वर लावून ठार मारण्याची‌ धमकी दिल्याची तक्रार खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी अनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून भूषण सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठ वाजता मेहरुणमध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रात्री साडे बारा वाजता हा गुन्हा‌ दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आपण असा प्रकारच केला नसल्याचा दावा भूषण सोनवणे यांनी केला आहे. पोलिसांनी चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असेही भूषण यांचे म्हणणे आहे.

Web Title: The revolver was brought to the plaintiff's head, threatening to withdraw the trial that started in court