शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नाल्यात सापडला निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह, ३ दिवसांपासून होते बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:45 IST

Retired Police Officer Found Dead : मृताचा मुलगा किशोर हा देखील पोलीस खात्यात असून तो नेहरू नगर पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत आहे.

मुंबई : मुलुंड पूर्व येथील एका नाल्यात 87 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला. तो १५ जूनपासून बेपत्ता होता आणि नाल्याच्या साफसफाईदरम्यान त्याचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मृताचा मुलगा किशोर हा देखील पोलीस खात्यात असून तो नेहरू नगर पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत आहे.मृत शिवदास कुमावत हे मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीत असलेल्या साईराम अपार्टमेंटमध्ये मुलासह कुटुंबासह राहत होते. वृद्धापकाळामुळे कुमावत यांची स्मरणशक्ती कमी झाली होती असून १५ जून रोजी ते फिरायला घरातून निघाले. मात्र, परत आलेच नाही, असे पोलिसांनी सांगितले. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंद करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण करून कुमावत घरातून फिरायला निघाले आणि रस्ता चुकला. दुसरा रस्ता पकडत ते परिसरातील महालक्ष्मी टॉवरवर पोहोचला. कुठे फूटपाथवरून चालत असताना कुमावत उघड्या नाल्यात पडले असावेत. प्राथमिक तपासात कुमावत यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असे पोलिसांना आढळून आले. मात्र हा अहवाल येईपर्यंत पुढील माहितीच्या प्रतीक्षेत पोलीस आहे. 

कुमावत यांच्या नातेवाईकाने सांगितले की, जेवण करून ते रोज फिरायला जायचे, मात्र १५ जूनला ते घरी परतलेच नाहीत. आम्ही संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही तपासले. नवघर पोलिसांनीही आम्हाला मदत केली, मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. "शिवदास कुमावत दिवसेंदिवस त्यांची स्मरणशक्ती गमावत होते आणि आम्हाला वाटते की, ते रस्ता चुकले आणि दुसर्‍या ठिकाणी गेले, जिथे त्यांचा नाल्यात पडून आपला जीव गेला असावा," असे पुढे नातेवाईक म्हणाले.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कांबळे (नवघर पोलिस स्टेशन) यांनी सांगितले की, रविवारी सकाळी नाल्याच्या साफसफाईदरम्यान एका व्यक्तीचा तरंगता मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMissingबेपत्ता होणं