शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांचाच फ्लॅट फोडला; उंड्रीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 21:26 IST

उंड्री येथील एका सोसायटीत एकाचवेळी दोन फ्लॅट फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस..

पुणे : शहरात घरफोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असून  उच्चभ्रु सोसायट्यांमध्येही बंद फ्लॅट फोडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. उंड्री येथील एका सोसायटीत एकाचवेळी दोन फ्लॅट फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी आणि नैला रिझवी यांचे बंद फ्लॅट फोडण्यात आले. याप्रकरणी न्याती विंडसर सोसायटीचे अध्यक्ष श्याम खंते (वय ६७) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राज खिलनानी हे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आहेत. ते लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख होते. ते बाहेरगावी गेले असताना २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान तीन चोरटे सोसायटीत शिरले. त्यांनी खिलनानी आणि रिझवी यांचे बंद फ्लॅटचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे दरवाजे उचकटून चोरी केली.राज खिलनानी हे मार्चमध्ये हैदराबाद येथे मुलीकडे गेले होते. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने गेले काही महिने ते तेथेच राहत होते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, नैला रिझवी यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही महत्वाचा ऐवज नव्हता. घरफोडीची माहिती मिळाल्यावर खिलनानी हे आज रात्री पुण्यात आले असून घरातील काय चिजवस्तू चोरीला गेल्या आहेत, हे पाहणी केल्यावर समजू शकेल़ सोसायटीतील एका सीसीटीव्हीमध्ये दूरवरुन तिघे चोरटे मध्यरात्री २ वाजता आत येताना व साधारण साडेतीन वाजता परत जाताना दिसून येत आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्व गुन्हे जवळपास थांबले होते. अनलॉक सुरु झाल्यानंतर चोरी, घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे़ जुलै २०२० अखेर शहरात १५९ घरफोडी चोºयांची नोंद करण्यात आली होती़ २४ ऑगस्ट २०२० अखेर १८५ घरफोड्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१९ अखेर शहरात ३३१ घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या.

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीThiefचोरRobberyचोरी