शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे फरार घोषित; महिन्याभराची मुदत, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:01 AM

महिनाभरात हजर झाला नाही तर मालमत्तेवर टाच आणणार. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तपासात बाळ बोठे याचा सहभाग आढळल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले. दरम्यान, न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. 

रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तपासात बाळ बोठे याचा सहभाग आढळल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्टँडिंग वॉरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम ८२ प्रमाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. १ मार्चच्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर गुरूवारी न्यायालयाने अंतिम आदेश दिला.

बोठेचा जाहीरनामा प्रसिद्धन्यायालयाने बोठेला फरार घोषित करण्याचा आदेश जारी केल्यानंतर पोलिसांनी बोठेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस आता अधिकारात असलेल्या सर्व प्रक्रिया राबविणार आहेत. यामध्ये आरोपीचा फोटो असलेले प्रसिद्धीपत्रक जारी करणे, पोस्टर तयार करून विविध ठिकाणी चिकटविणे, आरोपीबाबत माहिती सांगण्यासंदर्भात जनतेला आवाहन करणे आदी प्रक्रिया पोलिसांकडून राबविली जाऊ शकते.दरम्यान, जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दखल केले आहे. बोठेच्या अटकेनंतर त्याच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.बोठेच्या मालमत्तेची पोलिसांकडे कुंडलीबोठे पोलिसांना सापडला नाही अथवा तो स्वतःहून हजर झाला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची परवानगी न्यायालयाकडून पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आधीच बोठे याच्या मालमत्तेची माहिती घेऊन ठेवली आहे.

नगर - पुणे महामार्गावर जातेगाव घाटात ३० नोव्हेंबरला जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची सुपारी बोठे यानेच दिल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. सर्वत्र शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाने त्याच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बोठे ९ एप्रिलपर्यंत स्वतःहून पोलिसात हजर झाला नाही तर त्याच्या मालमत्ता जप्ती संदर्भातील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस