दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण!

By रवींद्र देशमुख | Updated: October 8, 2023 18:34 IST2023-10-08T18:33:09+5:302023-10-08T18:34:03+5:30

याप्रकरणी राहुल दवेवाले व अजय या दोघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

refused to drink alcohol; Then the bottle beat! | दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण!

दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण!

सोलापूर : दारू पिण्यासाठी जबरदस्ती करत असताना नकार दिल्याने दोघांनी एका तरुणास बेदम मारहाण करीत काचेची दारूची बाटली घेऊन मारून जखमी केले. ही घटना ८ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. 

याप्रकरणी राहुल दवेवाले व अजय या दोघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ विजयसिंग बाबावाले (वय २९, रा. उत्तर कसबा, लष्कर, बेडरपूल, सोलापूर) यानी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचा मित्र अब्दुल मुजावर याने फिर्यादीस इंदिरा गांधी स्टेडियम, सोलापूर येथे बोलविले. 

याचवेळी राहुल दवेवाले याने बोलावल्यावर आले असता तेथे फिर्यादी दशरथ यास दारू पी म्हणून जबरदस्ती करत असताना नकार दिल्याने शिवीगाळ देत असताना शिव्या देऊ नको असे म्हटल्यावर काचेची बाटली घेऊन मारून डाव्या कानाजवळ व डाव्या कानास दुखापत केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल वाडीकर हे करीत आहेत.

Web Title: refused to drink alcohol; Then the bottle beat!