'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 15:55 IST2020-05-27T15:53:08+5:302020-05-27T15:55:45+5:30

दारूचे व्यसन सुटत नसल्याने सासरे केरबा कांबळे जावई तानाजी याच्यासोबत मुलीला पाठविण्यास नकार देत होते़

'Refuse to come to home'; The drunken husband slit son's throat with his wife at | 'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला

'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला

ठळक मुद्देपळून जाणाऱ्या आरोपीस गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवले

मुखेड (जि़नांदेड) :  तालुक्यातील  मंडलापूर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची गळ्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार, २७ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली़

तानाजी भुताळे  (वय ३०) हा देगलूर तालुक्यातील येडूर येथील असून तो मंडलापूर येथे सासरवाडीला आला होता़  पत्नी वैशाली (वय २३) हिस गावी चल म्हणून त्याचा तगादा सुरू होता़ मात्र त्याचे दारूचे व्यसन सुटत नसल्याने सासरे केरबा कांबळे जावई तानाजी याच्यासोबत मुलीला पाठविण्यास नकार देत होते़

बुधवारी २७ मे रोजी मुखेड-देगलूर रोडवरील मंडलापूर शिवारात पत्नीच्या माहेरी रागात येऊन त्याने पत्नी वैशालीसह एक वर्षाचा मुलगा आदेश यांच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली़ या घटनेनंतर आरोपी तानाजी भुताळे पळून जात असताना नागरिकांनी त्यास पकडून झाडाला बांधून ठेवले व तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ आरोपी तानाजी भुताळे यास अटक करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी  उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठविण्यात आला आहे़ या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरोदे यांनी सांगितले.

Web Title: 'Refuse to come to home'; The drunken husband slit son's throat with his wife at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.