शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दोस्त दोस्त ना रहा! खास सहकाऱ्याकडूनच रवी पुजारीचा झाला 'गेम'; असा धरला पोलिसांनी नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 5:02 PM

या पहिल्या टिपनंतर पोलीस सक्रिय झाले आणि रवी पुजारीविरूद्ध फास आवळण्यास सुरवात केली.

ठळक मुद्देया फोटोमध्ये एका खेळाडूच्या टी-शर्टवर 'क्रिकेटर्स क्लब सेनेगल' लिहिले गेले होते.रवी पुजारी बुर्किना फासो येथे राहतो आणि हॉटेल चालवत आहे.

बंगळुरू - जवळपास  २० वर्षांपासून गुप्तचर यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेला कुख्यात गुंड रवी पुजारी याला पैशाच्या लालसेपोटी त्याच्याच सहकाऱ्याने पोलिसांनी दिली माहिती आणि पुजारीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं पकडले. कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेल्या रवी पुजारीसोबत बुर्किना फासो येथे राहणाऱ्या खबरीने पोलिसांना टिप स्वरूपात माहिती दिली. या पहिल्या टिपनंतर पोलीस सक्रिय झाले आणि रवी पुजारीविरूद्ध फास आवळण्यास सुरवात केली.

गँगस्टर रवी पुजारीच्या तपासासाठी राष्ट्रीय स्तरावर एसआयटी?

भारताला मोठं यश! अखेर रवी पुजारीचा मिळाला ताबा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील बुर्किना फासो रवी पुजारीच्या हॉटेलची चित्रे आणि इतर तपशील पोलिसांना दिला. एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) अमर कुमार पांडे आणि एसीपी व्यंकटेश प्रसन्ना यांना रवी पुजारीबद्दलची पहिली विश्वसनीय माहिती मिळाली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी रवी पुजारीविरोधात जून २०१८ मध्ये खून, खंडणी अशा अनेक घटनांनंतर तपास सुरू केला पण यश आले नाही.रवी पुजारी कोठे लपला होता हे माहित नव्हतेरवी पुजारी कोठे लपला आहे हे कोणालाही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. तपासादरम्यान अधिकारी अमर कुमार पांडे आणि प्रसन्ना यांना माहिती मिळाली होती की, पुजारीला पहिल्यांदा १९९२ मध्ये चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरम्यान त्यांना एक माहिती मिळाली की पुजारीकडे राहणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांना पैशाच्या बदल्यात माहिती देण्याचे मान्य केले.खबरी यांनी पोलिसांना सांगितले की, रवी पुजारी बुर्किना फासो येथे राहतो आणि हॉटेल चालवत आहे. दरम्यान, पोलिसांना आणखी एक खबरी भेटला आणि त्याने सांगितले की, रवी पुजारी नावाचा माणूस बुर्किना फासोमध्ये राहत नाही. तथापि फर्नांडिस नावाचा एक व्यक्ती आहे. फर्नांडिसच्या नावावर असलेला पासपोर्ट शोधण्यासाठी अधिकाऱ्यांना एक महिना लागला. एका खबरीने पोलिसांना क्रिकेट सामन्यामध्ये बक्षीस समारंभादरम्यानचा रवी पुजारीचा फोटो दिला.टी-शर्टवरून मिळाली ठोस माहिती 

या फोटोमध्ये एका खेळाडूच्या टी-शर्टवर 'क्रिकेटर्स क्लब सेनेगल' लिहिले गेले होते. सेनेगलमध्ये पुजारी लपून बसल्याची माहिती पांडे आणि प्रसन्ना या अधिकाऱ्यांच्या हाती लागली. त्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला त्याविषयी माहिती दिली. नंतर लवकरच पुजारीला दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथून अटक करण्यात आली. अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारी यांना सेनेगल येथून अटक करून बंगळुरू येथे आणण्यात आले आहे. तीन दशकांपासून पोलिसांपासून लपून राहिलेले कुख्यात गुंड रवी पुजारी जगातील अनेक देशांतून व्यवसाय करीत होता.मागील वर्षी 19 जानेवारी रोजी सेनेगल पोलिसांनी त्याला हेअर कलरच्या सलूनमध्ये जाताना अटक केली. त्यानंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रवी पुजारी यांना हद्दपार करून कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कर्नाटक पोलिसांनी सांगितले की, रवी पुजारी 1994 मध्ये भारत सोडून पळाला होता आणि यावेळी तो पाच देशांत चार वेळा नाव बदलत राहिला असावा.

रवी पुजारी कोण आहे?

*52 वर्षीय रवी पुजारी यांचा जन्म कर्नाटकातील उडुपी येथे झाला.*इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषांचे ज्ञान त्याला आहे.* वारंवार नापास झाल्यामुळे शाळा सुटली.* कुटुंब, पत्नी, २ मुली आणि एक मुलगा. नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये 28 वर्षीय मुलाचे लग्न झाले होते.-*२००५ साली पत्नी पद्माच्या बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक. स्वतःवर आणि मुलींसाठी बनावट पासपोर्ट बनवल्याचा आरोप पत्नीवर होता. बंगळुरूमध्ये जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा बनावट पासपोर्ट बनवून भारतातून पळाला.* अशी चर्चा आहे की, रवी पुजारीकडे ऑस्ट्रेलियन पासपोर्ट आहे. तो वारंवार चीन, हाँगकाँग आणि पश्चिम आफ्रिकेत फिरायचा.* इंटरपोलने पुजारी आणि त्यांची पत्नी पद्मा दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.* १९९० साली पुजारी अंधेरी, मुंबई येथे राहत होता आणि इतर कुख्यात गुन्हेगारांसह छोटा राजनशी सलगी झाली होती. लवकरच विजय शेट्टी आणि संतोष शेट्टी यांच्यासह पुजारीही छोटा राजनच्या टोळीत सामील झाला.                                                                                                                    *१९९५ साली  चेंबूरमध्ये बिल्डर प्रकाश कुकरेजाची हत्या केल्यानंतर ही टोळी अचानक चर्चेत आली.*२००० साली बँकॉकमध्ये छोटा राजनवर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांनी हल्ल्या केल्यानंतर त्याने स्वत: ची टोळी तयार केली. इतर गुन्हेगारांप्रमाणेच त्याने दुबईहून खंडणी मागण्याचा धंदा सुरू केला.* २००३ साली नवी मुंबईत बिल्डर सुरेश वाधवा यांच्या हत्येचा प्रयत्न केला.*२००५ साली पुजारीच्या सांगण्यावरून गुंडांनी वकील माजिद मेनन यांना गोळ्या घातल्या.

काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रवी पुजारीने स्वत: ला 'देशभक्त डॉन' म्हणून ओळख करून दिली. त्या मुलाखतीत पुजारी म्हणाले की, दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असणार्‍या प्रत्येक व्यक्तींचा मी खात्मा करू इच्छितो.

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीunderworldगुन्हेगारी जगतArrestअटकSouth Africaद. आफ्रिकाBengaluruबेंगळूर