शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रावेर दंगल भोवली, पाच जणांची नाशिक कारागृहात रवानगी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 3:18 PM

एकाच वेळी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव - रावेर येथे २२ मार्च रोजी उसळलेल्या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या पाच जणांविरुध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. याआधी देखील या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या ३७७ संशयितांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यात झालेले नुकसान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून वसूल करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. एकाच वेळी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.एमपीडीएची कारवाई झालेल्यांमध्ये आदीलखान उर्फ राजू बशीर खान (२२, रा.फुकटपुरा, रावेर), शेख मकबूल अहमद शेख मोहीनोद्दीन (५७, रा.मन्यारवाडा, रावेर), स्वप्नील मनोहर पाटील (२६, रा.बक्षीपूर, ता.रावेर), शेख कालू शेख नुरा (५३, रा.रावेर), व मधुकर उर्फ मधू पहेलवान रामभाऊ शिंदे (६२, रा.रावेर) यांचा समोवश आहे. त्यांना लागलीच स्थानबद्ध करुन रविवारी नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी प्रस्ताव तयार करुन तो जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे पाठविला होता. राऊत यांनी शनिवारी आदेश काढले व रविवारी या पाच जणांना स्थानबध्द करण्यात आले.रावेर येथे झालेल्या दंगलीत एक जण ठार झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्याशिवाय या दंगलीत ६ कोटी २० लाख ९१ हजार ५५ रुपयांचे नुकसान झाले होते. दंगल व इतर गुन्ह्यांना आळा बसावा, गुन्हेगारांनी डोक वर काढू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दंगलीला कारणीभूत ठरलेल्यांविरुध्द एमपीडीएची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर दंगलीचा अभ्यास करुन गुन्हेगारांची कुंडली काढली. त्यात या पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला. प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षकांच्या मान्यतेनंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे पाठविण्यात आला होता. राऊत यांनी हा प्रस्ताव मंजूर करुन एमपीडीएचे आदेश जारी केले.काय आहे एमपीडीएएखाद्या गुन्हेगारापासून समाजाला धोका पोहचत असेल तर त्याच्याविरुध्द एमपीडीएची कारवाई करण्यात येते. त्यात महाराष्टÑ झोपडपट्टी,हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती अर्थात व्हीडीओ पायरेट, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या कृत्यांना आळा घालण्याचा नियम ३८१ प्रमाणे ही कारवाई करण्यात येते. रावेर दंगलीतील पाचही जणांना नोटीसा बजावून रविवारी दुपारी १२.४० वाजता नाशिक कारागृहात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी ह्यलोकमतह्ण ला दिली.रावेरात ७४ वर्षात ४२ दंगलीरावेर शहरात १९४६ ते मार्च २०२० या कालावधीत ७४ वर्षात धार्मिक तेढ निर्माण करणाºया तब्बल ७४ दंगली झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. प्रत्येक दंगलीत गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे, त्यांना कारागृहात पाठविणे व कायद्यान्वे शिक्षा या प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली गेली आहे. आता प्रथमच नुकसान करणाऱ्यांकडून त्याची वसुली करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव